‘नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’मध्ये छत्रपती शिवरायांची बखर सापडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा उल्लेख या बखरीमध्ये करण्यात आला आहे. पुण्याचे इतिहासकार गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांच्या संशोधनामध्ये ही बखर सापडली आहे. ‘नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’मध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रे चाळत असताना इतिहासकारांना छत्रपती शिवरायांची ही अप्रकाशित बखर सापडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याचे इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी हे संशोधनासाठी ‘नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’मध्ये गेले होते. त्यावेळी पाहणी करत असताना इतिहासकालीन दस्तावेज सापडले. मोडी लिपीतील हस्तलिखित असलेली ही बखर १७४० नंतर लिहिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीमध्ये आहे.
हे ही वाचा..
घुसखोर बांगलादेशींना हुडकून हाकलून लावा
पावसाच्या हजेरीमुळे मुंबईत वाहतूक कोंडी!
पंतप्रधान मोदी श्रीनगरमधील दाल सरोवराच्या काठावर योग दिन साजरा करणार?
कुवेतमधील ४५ भारतीयांचे मृतदेह भारतात पोहोचले, अग्निकांडात गमावला होता जीव!
तसेच अनेक ऐतिहासिक घटना या बखरीमध्ये आहेत. ज्यामध्ये छत्रपती शिवराय आणि सईबाई यांच्याशी झालेला संवाद, बोरीची काठी शिवरायांच्या पालखीला कशी आडकाठी करत होती?, अफझलखानाला मारले त्यावेळी कोणकोण हजर होते?, छत्रपती संभाजी महाराजांना रायगडावर कसे ताब्यात घेतले गेले, या अशा विविध इतिहासकालीन घटनांचे तपशील या बखरीमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत.
इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले की, पॅरिसच्या स्टेट अर्काईफमध्ये ही कागदपत्रे २००-२५० वर्ष पडून आहेत. सापडलेल्या दस्तावेजमध्ये तीन रुमाल आहेत. त्यातील काही रुमालांमध्ये पानिपतच्या आखिगती आहेत, काही धार्मिक पोथ्यांचा समावेश आहे. एका दफ्तरामध्ये सभासद बखर आहे. याबाबत अनेक बखर प्रकाशित आहेत. परंतु, आम्हाला सापडलेली जी बखर आहे ती सगळ्यात नवीन असून आतापर्यंत कोठेही प्रकाशित झालेली नाही. साधारपणे ८३-८४ पानी ही बखर मोडी लिपीत आहे. ते पुढे म्हणाले की, याचे आम्ही देवनागरी लिपीमध्ये लिप्यांतर केले आहे आणि त्याला लागणाऱ्या नोट्स, टिपा आणि परिशिष्ठे याची जोडणी केली आहे. साधारपणे १५० पानी पुस्तक असून २३ जूनला या पुस्तकाचे आम्ही प्रकाशन करणार आहोत.