मराठी माणसाचा आदर्श आणि हजारो वर्षात एकदाच जन्म घेणारा राजा म्हणजे “छत्रपती शिवराय”!

मास्टर ब्लास्टर सचिनसह माजी फलंदाज सेहवागने शिवरायांना केले अभिवादन

मराठी माणसाचा आदर्श आणि हजारो वर्षात एकदाच जन्म घेणारा राजा म्हणजे “छत्रपती शिवराय”!

भारताचा महान योद्धा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी शहाजी भोसले महाराज’ यांची आज ३९४ वी जयंती आहे.आज १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ठिकाणी ‘शिव जयंती’ साजरी करण्यात येत आहे.तसेच शिव जयंती निमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत.पंतप्रधान मोदींनी देखील महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.यासह क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनी देखील शिवरायांना अभिवादन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे.शिव जयंतीनिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या जन्मस्थळी जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर राज्य सरकारकडून शिव जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त देशभरातील मंत्री, राजकीय नेत्यांकडून, शिवभक्तांकडून शिवरायांना अभिवादन करण्यात येत आहे.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही शिवरायांना अभिवादन केले आहे.सचिन तेंडुलकर यांनी ट्विटकरत लिहिले की, जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम. मराठी माणसाचा आदर्श असावा असा ह्यांचासारखा राजा हजारो वर्षात एकदा जन्म घेतो, असे ट्विट सचिन यांनी केले आहे.

हे ही वाचा:

‘फारुख अब्दुल्ला मोदींना भेटत असत!’

अफगाणिस्तानात जिवंत लोकांचे फोटो काढण्यास मनाई

अखिलेश म्हणाले, जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतरच समाजवादी ‘न्याय यात्रेत’ सहभागी होईल!

‘अश्विनचा घरी परतण्याचा निर्णय योग्यच!’

सचिनसह माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही शिवरायांना नमन केले आहे.वीरेंद्र सेहवागने ट्विट करत लिहिले की, इतिहास आपणास सांगतो की, सामर्थ्यवान लोकं हे सामर्थ्यशाली ठिकाणातून येत असतात.पण, हा इतिहास चुकीचा आहे. सामर्थ्यवान लोकं त्या ठिकाणांना सामर्थ्यवान बनवतात, असे सेहवागने ट्विटकरत महाराजांना अभिवादन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप, त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.” असं मोदींनी म्हटलं आहे. यासह शिवरायांचा एक खास व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

 

Exit mobile version