गोराईत होणार छत्रपती शिवरायांचे वॉर म्युझियम

बेकायदा बांधकाम उद्ध्वस्त केले

गोराईत होणार छत्रपती शिवरायांचे वॉर म्युझियम

गोराई परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या शासकीय जागेवरील बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले होते. त्यानुसार शासनाने या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली आहे. या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य आणि आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे. जेणेकरून पुढील पिढ्यांना छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल.

मुंबई उपनगरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार नुकतीच मालवणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन ६ जून रोजी देशभरात साजरा केला जात आहे. त्याचवेळी मंत्री लोढा यांनी ही घोषणा केली आहे.

हे ही वाचा:

गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर करण्याचा घाट, पोलिसांनी केला पर्दाफाश

नौदलाच्या हेवीवेट टोर्पेडोने पाण्याखालील लक्ष्य अचूक वेधले

दुर्गा देवीवरील अभद्र टिप्पणीबाबत उच्च न्यायालयाने कान उपटले

लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना अमेरिकेचे सडेतोड उत्तर

मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने मुंबईतील शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी आणि गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य आणि सागरी युद्धकलेची प्रेरणा व माहिती देण्यासाठी येत्या काळात त्या जागेवर भव्य संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. येथे उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयातून येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल, असेही या निमित्ताने सांगण्यात आले आहे.

Exit mobile version