छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली सुप्रसिद्ध ‘वाघनखे’ लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम लवकरच राज्य सरकारला परत करणार आहे. त्यानंतर या वाघनखांचे प्रदर्शन देशभरात केले जाणार आहे. त्यामुळे इतिहासाच्या नवीन संशोधनास मदत मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
ही वाघनखे नोव्हेंबरमध्ये दुबईत आणली जातील. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेकाच्या तारखेला म्हणजेच ६ जून २०२४ री वाघाचे पंजे भारतात परत येतील, असा करार लंडनच्या संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे, असे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यानंतर ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातच नव्हे तर राज्य सरकारने सुचवलेल्या भारतातील चार ठिकाणीही प्रदर्शित केली जातील, असे या सामंजस्य करारात नमूद करण्यात आल्याचे संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.
‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाचे स्वागत करण्यास मी उत्सुक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफझलखानावर विजयाची कथा ही महनीय आहे. त्यामुळे ही वाघनखे शिवाजी महाराजांच्या ३५०व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून भारतात परततील. तेथे उत्सवाचा एक भाग म्हणून त्याचा आनंद घेता येईल,’ असा विश्वास या म्युझिअमच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला आहे.
हा सामंजस्य करार सध्या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात आहे. ‘एकदा स्वाक्षरी केल्यावर, औपचारिक कराराच्या अंमलबजावणीला चालना मिळेल. ही प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या आठवड्यात मुनगंटीवार यांनी वाघनखे या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईत आणली जाऊ शकतात, अशी आशा व्यक्त केली होती. मुनगंटीवार या महिन्याच्या अखेरीस ब्रिटनला भेट देतील आणि व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसह सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतील. तिथे ते ३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केले जाईल.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेतले, जरांगेंचे उपोषण मागे
केरळमध्ये ‘निपाह’चा पाचवा रुग्ण; मिनी लॉकडाऊन लागू
बिहारमधील ‘वैशाली’ लोकशाही उत्सवात प्रियदर्शी दत्तांच्या पुस्तकाचे प्रकाशन
उद्धव ठाकरे यांच्या लंडनमधील प्रॉपर्टीवर शिक्कामोर्तब
एड्रियन ग्रँट डफ हे साताऱ्याचे रहिवासी असताना त्यांना ही वाघनखे मराठ्यांच्या पेशव्यांच्या पंतप्रधानांनी दिली होती. डफ ती वाघनखे आपल्यासोबत ब्रिटनला घेऊन गेला आणि त्याच्या वंशजांनी ती व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाला दान केली होती.