26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषछत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्राकडे तीन वर्षांसाठी येणार!

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्राकडे तीन वर्षांसाठी येणार!

वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय तसेच, सातारा, नागपूर आणि कोल्हापूर येथील संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार

Google News Follow

Related

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमद्वारे राज्य सरकारला केवळ तीन वर्षांसाठी दिली जाणार आहेत. या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या सरकारी ठरावात हे नमूद करण्यात आले आहे.

 

नोव्हेंबरमध्ये मुंबईत आणली जाणारी ही वाघनखे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय तसेच, सातारा, नागपूर आणि कोल्हापूर येथील संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार आहेत. ही वाघनखे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, साताऱ्याचे श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, नागपूरचे सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापूरच्या लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये प्रदर्शित केली जाणार आहेत. ही वाघनखे लंडनमधून आल्यानंतर देशांतर्गत सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य सरकारने ११ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. वाघनखांचे सार्वजनिकरीत्या प्रदर्शन करण्यासंदर्भातील सर्व आराखडे ही समितीच अंतिम करेल.

 

हे ही वाचा:

आशियाई स्पर्धेत नेमबाजांची रौप्य पदकाला गवसणी

शिक्षिकांचे विद्यार्थ्यांना आदेश…आमचे रिल्स लाइक करा, शेअर करा!

न्यूयॉर्कमध्ये पूर; रस्त्यांना आले नद्यांचे रूप

दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे ‘मैदानात’

ही वाघनखे नोव्हेंबरमध्ये मुंबईला येणार आहेत, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या संदर्भातील ब्रिटनच्या म्युझियमशी होणाऱ्या कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्यासाठी मुनगंटीवार ३ ऑक्टोबर रोजी ब्रिटनला भेट देणार आहेत. त्यावेळी लंडनलाच असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील या कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी होताना तिथे उपस्थित असतील, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. शिंदे यांनी नुकताच त्यांचा ब्रिटन आणि जर्मनीचा आठवडाभराचा नियोजित दौरा स्थगित केला.

 

या ११ जणांच्या समितीचे अध्यक्षपद सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव विकास खरगे भूषवतील. तसेच, या समितीत काही सरकारी अधिकारी, पोलिस महासंचालकांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी, मुंबई आणि नागपूरचे पोलिस आयुक्त आणि राज्याच्या पुरातत्त्व आणि वस्तूसंग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे यांचा समावेश असेल. भारतातील वाघनखांच्या प्रदर्शनामुळे शस्त्रांच्या नवीन संशोधनात भर पडेल, असा विश्वास ब्रिटनच्या म्युझियमने व्यक्त केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा