बिपीन रावत यांना फेटा बांधता येत होता… संभाजीराजेंनी सांगितल्या आठवणी

बिपीन रावत यांना फेटा बांधता येत होता… संभाजीराजेंनी सांगितल्या आठवणी

तामिळनाडूत लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात दुर्घटनाग्रस्त झाले.

जनरल बिपीन रावत आणि खासदार संभाजीराजे यांचे चांगले संबंध असून संभाजीराजे यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना बिपीन रावत यांच्या आठवणींना उजाळा दिला. बिपीन रावत यांच्याशी भेट झाली त्यावेळी त्यांनी आम्ही शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करतो हे दाखवून द्यायचे होते. बिपीन रावत यांच्यावर शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाचे चालणारे संस्कार होते, असे त्यांनी सांगितले.

संभाजीराजे यांनी रावत यांची एक आठवण सांगताना सांगितले की, ते शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यास येणार होते त्यावेळी त्यांना फेटा बांधण्यात येणार होता. त्यावेळी फेटा बांधण्यासाठी मदतीला पाठवतो असे सांगितले तेव्हा त्यांनी मला फेटा बांधता येतो असे सांगितले. त्यावेळी बिपीन रावत हे स्वत: उत्तम फेटा बांधून आले होते, असे संभाजी छत्रपती म्हणाले.

हे ही वाचा:

३७० हटवल्यावर काश्मीरमधून हिंदू पळाले का? किती अतिरेकी मारले गेले?

भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली बिपीन रावत यांना श्रद्धांजली

पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार

बिपीन रावत घरी आले होते त्यावेळी त्यांनी ताराराणी यांचा फोटो पाहिला. तेव्हा त्यांनी त्यासंदर्भात माहिती घेतली. कर्तृत्ववान ताराराणी यांच्याबद्दल जाणून घेऊन त्यांना अभिमान वाटला होता आणि त्यांच्या फोटोसोबत फोटो काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. तेव्हा आम्ही सोबत फोटो काढला, असे संभाजी छत्रपती म्हणाले.

छोट्या छोट्या गोष्टींसाठी, त्यांच्या मार्गदर्शनासाठी सतत संपर्क करत असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले. राष्ट्रपती हे रायगडावर येणार होते त्यावेळीही परवानग्या आणि इतर गोष्टीसांठी मी मनोज नरवणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर बिपीन रावत यांना मेसेज केला होता, असेही संभाजी छत्रपती म्हणाले.

दोन वर्षापूर्वी कोल्हापूर आणि सांगलीला पूर आला होता त्यावेळी मी त्यांना तातडीने बोलू शकतो का असा मेसेज केला होता, त्यावर त्यांचा लगेच मला फोन आला होता, असे संभाजीराजे यांनी सांगितले. त्यांनी मार्गदर्शन केले, त्यानंतर एका तासात यंत्रणा हलली. कोल्हापूर आणि सांगलीकरांना मदतीसाठी एनडीआरएफच्या तुकड्या मिळाल्या होत्या, अशा काही आठवणींना संभाजीराजेंनी उजाळा दिला.

Exit mobile version