छत्रपती संभाजी नगर, धाराशिव नामफलकाचे अनावरण

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

छत्रपती संभाजी नगर, धाराशिव नामफलकाचे अनावरण

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचे नामकरण अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे करण्यात आले. केंद्र सरकारकडून या दोन्ही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे दोन्ही जिल्ह्यांचा उल्लेख हा जुन्या पद्धतीनेच सरकार दफ्तरी करण्यात येत होता. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महसुली विभागाच्या नामकरण फलकाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार

उत्तर प्रदेशातले गोई हे वटवाघळांचे गाव

के. सी. कॉलेज खेलो इंडिया बास्केटबॉल स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये

लष्कराचे सामर्थ्य वाढणार; ४५ हजार कोटींची स्वदेशी उपकरणे खरेदीला मंजुरी

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी छत्रपती संभाजी नगर येथे मंत्रिमंडळ बैठाकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह मंत्रिमंडळ छत्रपती संभाजी नगरमध्ये दाखल झाले होते. बैठकीपूर्वी या दोन्ही जिल्ह्यांच्या महसुली विभाग, जिल्हा, तालुका, जिल्हा, गाव याच्या नामकरण फलकाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केल्याने परिसर दणाणून गेला होता. यावेळी स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Exit mobile version