विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांचे वर्णन करणारा हा ऐतिहासिक नाट्यमय चित्रपट दुसऱ्या आठवड्यात एका नवीन उंचीवर पोहोचला आहे. आतापर्यंत चित्रपटाने ३२६.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.
१४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाचा आजचा १० दिवस. अवघ्या तीन दिवसात १०० कोटींचा आकडा पार केला होता. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होतीच. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार चित्रपटाने ३२६.७५ कोटी रुपयांची कमी केली असून लवकरच ४०० कोटींचा आकडा पार असे बोलले जात आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरयांच्या ‘छावा’ चित्रपटाची संपूर्ण देशभरात चर्चा आहे. दिल्लीत पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख केला होता. महाराष्ट्राच्या मुंबईने मराठी सिनेमा बरोबर हिंदी सिनेमालाही एक नवी उंची दिली आहे आणि आजकाल ‘छावा’ चित्रपटाचा गाजावाजा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
हे ही वाचा :
कॉलेजमधून परतत असताना विद्यार्थिनीवर बलात्कार
भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील
पीएम-किसान योजनेला सहा वर्षे पूर्ण; १० कोटी लाभार्थ्यांना मिळणार २००० रुपये
“शरद पवार गप्प कसे राहू शकतात?” नीलम गोऱ्हेंच्या विधानावरून संजय राऊत संतापले
अभिनेता विकी कौशलसह चित्रपटातील कलाकारांनी साकारलेल्या भूमिका साजेस्या होत्या. सर्व स्तरावरून अभिनेत्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांचा केलेला छळ अभिनेता विकी कौशलने हुबेहुबे दाखवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजी महाराजांवर त्याकाळी झालेले अत्याचार पाहून प्रेक्षकांनी डोळ्यात पाणी आणले. चित्रपटगृहात, चित्रपट गृहाबाहेर अनेक जण ओक्साबोक्षी रडले. अनेकांनी चित्रपटगृहातच शिवगर्जना दिली. विशेष म्हणजे, मुघलांचा अत्याचार पाहून गुजरातमधील एका प्रेक्षकाने सिनेमाचा पडदाच फाडून टाकला होता.