स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदावरून चेतन शर्मा पायउतार

भारतीय क्रिकेट बोर्डाने स्वीकारला राजीनामा

स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदावरून चेतन शर्मा पायउतार

भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

१४ फेब्रुवारीला चेतन शर्मा यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. राष्ट्रीय संघाच्या विविध मुद्द्यांवर त्या व्हीडिओत ते बोलताना दिसले. विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासंदर्भातही ते बोलताना दिसतात. जसप्रीत बूमराहच्या दुखापतीबाबतही त्यांचे विधान आहे. यावेळी त्यांचा कुणी व्हीडिओ करत आहे, याची त्यांना जाणीव नसल्याचे लक्षात येते.

यासंदर्भात बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चेतन शर्मा यांनी राजीनामा दिलेला आहे. सचिव जय शहा यांच्याकडे राजीनामा सादर करण्यात आला आहे. या स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा अडचणीत सापडले आहेत.

चेतन शर्मा यांना पुन्हा एकदा निवड समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीनंतर चेतन शर्मा यांना हटविण्यात आले होते.

हे ही वाचा:

आईच्या निधनामुळे संतापून इंग्रजांविरुद्ध त्या तरुणाने बंडाचे निशाण उभारले!

मेघालय नंतर आता काश्मीरला भूकंपाचे धक्के

गिरीश बापट यांच्यामुळे कसब्याचा गड मजबूत

विदेशात नाही भुर्र; आता काश्मीर टूर

 

झी न्यूजने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा बोलतात की, खेळाडू हे तंदुरुस्त असतात तेव्हा ते फक्त ८५ टक्के तंदुरुस्त असतात. आम्हाला खेळू द्या अशी ते मागणी करतात पण वैद्यकीच विज्ञानामुळे त्यांना खेळण्याचा परवानगी देता येत नाही. बुमराह तर वाकूही शकत नव्हता. एक किंवा दोन दुखापती झालेल्या होत्या. हे खेळाडू इतके लबाड आहेत की, ते एका कोपऱ्यात जातात आणि एक इंजेक्शन घेतात आणि मग म्हणू लागतात की आम्ही तंदुरुस्त आहोत. चेतन शर्मा त्यात म्हणतात की, ते वेदनाशामक गोळ्या घेत नाहीत. कारण त्यातून उत्तेजक चाचणीत अडकण्याचा धोका असतो. त्यांना हे ठाऊक असते की, यासाठी कोणते इंजेक्शन घ्यायचे जे उत्तेजक चाचणीतून पकडले जाणार नाही. ते मोठे सुपरस्टार आहेत. ते एक फोन फिरवतात आणि डॉक्टर त्यांच्याकडे रात्री पोहोचतात. त्यांना एक इंजेक्शन देतात.

चेतन शर्मा यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली. त्याची चौकशी बीसीसीआयच्या माध्यमातून केली गेली.

Exit mobile version