मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन एस पाटील याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी चेतन पाटीलला आज न्यायालयात केले असता न्यायालयाने त्याला ५ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली. दुसरीकडे, शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन एस पाटील आणि कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीचा मालक जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर हे दोघेही फरार होते.
मालवण पोलीस ठाण्यात बांधकाम सल्लागार चेतन पाटील आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या अटकेसाठी सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात तळ ठोकून होते. अखेर कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी (३० ऑगस्ट) पहाटे तीनच्या सुमारास पाटील याला त्याच्या शिवाजी पेठेतील घरातून ताब्यात घेतले. यानंतर पुढील तपासासाठी त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे देण्यात आला.
मालवण पोलिसांनी चेतन पाटीलचा ताबा घेत आज मालवण येथील दिवाणी न्यायालयात हजर केले. यानंतर न्यायालयाने चेतन पाटीला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा :
२२ जणांसह रशियन हेलिकॉप्टर बेपत्ता !
चंपाई सोरेन यांच्यानंतर लोबिन हेमब्रमही भाजपमध्ये दाखल !
पत्राचाळ प्रकरण: फडणवीसांचे नाव घेण्यासाठी दिली होती धमकी
राहुल, अखिलेश आणि तेजस्वी यांचे सरकार बनले तर भारताचा पाकिस्तान-बांगलादेश होईल !