25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषचेतक: राष्ट्रसेवेची ६० गौरवशाली वर्षे

चेतक: राष्ट्रसेवेची ६० गौरवशाली वर्षे

Google News Follow

Related

भारतीय हवाई दलाच्या सेवेत असलेल्या चेतक या लढाऊ हेलिकॉप्टरने राष्ट्राच्या सेवेत ६० वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने भारतीय सैन्यातर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, २ एप्रिल रोजी करण्यात आले होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी संरक्षण मंत्र्यांनी चेतक हेलिकॉप्टरवरील एक विशेष लिफाफा, कॉफी टेबल बुक आणि या हेलिकॉप्टरच्या आतापर्यंतच्या कामगिरीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या चित्रपटाचे प्रकाशन केले.

गेल्या सहा दशकांमध्ये, शांतता आणि संघर्ष या दोन्ही काळात, तसेच एकात्मता आणि संयुक्त कार्याची भावना वाढवण्यात चेतक हेलिकॉप्टरचे योगदान महत्वाचे असल्याचे यावेळी संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले. या हेलिकॉप्टरला इतकी वर्षे यशस्वीरित्या कार्यरत ठेवण्यामध्ये ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे विशेषत: HAL ही सरकारी कंपनी, जी 1965 पासून परवान्या अंतर्गत या हेलिकॉप्टरची निर्मिती करून ‘आत्मनिर्भरते’ची ध्वजवाहक आहे, त्यांच्या अफाट योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. या अनुभवाच्या आधारे HAL ने अत्याधुनिक हेलिकॉप्टरची रचना, विकास आणि उत्पादन क्षमता कशी तयार केली हे देखील त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

काश्मीर फाईल्स विरोधात पुन्हा शरद पवारांची मळमळ

गतविजेत्या इंग्लंडला धूळ चारत ऑस्ट्रलियन महिलांनी सातव्यांदा उचलला विश्वचषक

पवन एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले, एक ठार

काश्मिरी पंडितांनी श्रीनगरमध्ये साजरा केला ‘नवरेह’ सण

या प्रसंगी त्यांनी चेतक हेलिकॉप्टरच्या साठ वर्षांच्या गौरवशाली सेवेचे दर्शन घडवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनालाही संरक्षण मंत्र्यांनी भेट दिली.आणि सुरक्षा परिषदेला उपस्थित असलेल्या सशस्त्र दलातील माजी सैनिक आणि इतर मान्यवरांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी आणि एओसी-इन-सी ट्रेनिंग कमांड एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्यासह माजी हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल एफ एच मेजर (निवृत्त), एअर चीफ मार्शल एनएके ब्राउन (निवृत्त) आणि माजी नौदल प्रमुख, अॅडमिरल करमबीर सिंग (निवृत्त) यांची या परिषदेला प्रमुख उपस्थिती होती

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा