धावगतीवरून टीका करणाऱ्यांना कोहलीचे सडेतोड प्रत्युत्तर!

बेंगळुरूचा गुजरातवर विजय

धावगतीवरून टीका करणाऱ्यांना कोहलीचे सडेतोड प्रत्युत्तर!

रविवारी अहमदाबाद येथे गुजरातविरुद्ध रंगलेल्या सामन्यात ४४ चेंडूंत ७० धावा ठोकून बेंगळुरूच्या विराट कोहलीने त्याच्या टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. या सामन्यात बेंगळुरूने गुजरातचा नऊ विकेट राखून पराभव केला. कोहलीने तीन षटकार आणि सहा चौकार लगावून विल जॅक्ससोबत १६६ धावांची भागीदारी केली. तर, विल जॅक्सने ४१ चेंडूंत नाबाद १०० धावा केल्या. त्यामुळे गुजरातने ठेवलेले २०१ धावांचे लक्ष्य बेंगळुरूने अवघ्या १६ षटकांत पार केले.
कोहलीने टीकाकारांच्या टीकेला आपण महत्त्व देत नसल्याचे स्पष्ट केले.

‘जे धावगतीबद्दल बोलतात आणि मी फिरकीपटूविरोधात चांगला खेळू शकत नाही, असे सांगतात, त्यांनाच हे असं काहीबाही बोलायला आवडतं. पण मला विचाराल तर, मला केवळ संघाला विजय मिळवून देण्यात स्वारस्य असतं. आणि यामागचं एक कारण म्हणजे तुम्ही गेली १५ वर्षे हेच करताय,’ असे विराट कोहली गुजरातच्या सामन्यानंतर म्हणाला.

‘तुम्ही हे सातत्याने केले आहे. तुम्ही तुमच्या संघासाठी सामना जिंकून दिला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नसता, तेव्हा बॉक्समध्ये बसून खेळाबद्दल बोलणे कितपत शक्य होते, हे मी सांगू शकत नाही. माझे काम आहे, संघाला विजय मिळवून देणे. लोक बसून त्यांच्या स्वतःच्या कल्पना आणि गृहितके मांडतात. परंतु जे सातत्याने हेच करत आहेत, त्यांना हे चांगलेच माहीत आहे की ते काय करत आहेत,’ असे कोहली म्हणाला.

हे ही वाचा:

६०२ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह १४ पाकिस्तानी तस्करांना अटक!

औरंगजेब सांगा कुणाचा ?

गुजरात-राजस्थानमध्ये चार ड्रग मॅन्युफॅक्चरिंग लॅबचा पर्दाफाश!

मला संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे धन्यवाद!

गेल्या आठवड्यात बेंगळुरूने हैदराबादवर विजय मिळवला असता कोहलीला त्याच्या धावगतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. कोहलीने त्या सामन्यात ४३ चेंडूंत अवघ्या ५१ धावा केल्या होत्या.

बॅटने दिले उत्तर
रविवारच्या सामन्यात कोहलीने पॉवरप्लेमध्ये फिरकीपटूंना धुतले. गुजरातच्या आर. साई किशोरला त्याने दोन षटकार खेचले. पॉवरप्लेमध्ये कोहली धीम्या गतीने खेळतो, अशी सातत्याने टीका होते. मात्र येथे त्याने टीकाकारांना उत्तर दिले. त्याने अफगाणिस्तानची फिरकीपटूंची जोडगोळी रशिद खान आणि नूर अहमद यांच्या गोलदांजीवर आक्रमण केले. त्याने ३२ चेंडूंत ५० धावा केल्या. विल जॅक्स फॉर्मात असल्याने त्याने सहाय्यकाची भूमिका चोख बजावली. विलने १० षटकार खेचून ४१ चेडूंत १०० धावा ठोकल्या. कोहलीने यंदाच्या आयपीएल हंगामात १० सामन्यांत ५०० धावा ठोकल्या आहेत. त्याची सध्याची धावगती १४७ आहे.

Exit mobile version