… म्हणून कंपनीने १०० कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या

… म्हणून कंपनीने १०० कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या

चेन्नईमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कार भेट म्हणून दिली आहे. Ideas2IT या कंपनीने तब्बल १०० कर्मचाऱ्यांना कार भेट दिली आहे. या १०० कारची किंमत सुमारे १५ कोटी असल्याची माहिती आहे.

Ideas2IT नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. या कंपनीने आपल्या १०० कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकी कार भेट दिल्या आहेत. कंपनीच्या यशासाठी आणि वाढीसाठी या कर्मचाऱ्यांनी जे योगदान दिलं आहे त्यासाठी त्यांना ही कार बक्षीस म्हणून देण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Ideas2IT कंपनीच्या मार्केटींग प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या कंपनीत पाचशे कर्मचारी काम करत असून त्यापैकी १० वर्षांपेक्षा जास्त काळ कंपनीसाठी काम करणाऱ्या आणि कंपनीच्या वाढीसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने ही भेट दिली आहे.

“कंपनीला मिळालेला नफा हा कर्मचाऱ्यांसाठी देण्याचा आमचा संकल्प आहे. आमच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना हे बक्षीस मिळत आहे. कंपनीचे ठरलेलं ध्येय पूर्ण केल्यावर आम्ही कंपनीचा नफा कर्मचाऱ्यांसोबत वाटून घेऊ असं आश्वासन कर्मचाऱ्यांना सात ते आठ वर्षांपूर्वी दिलं होतं,” असे कंपनीचे संस्थापक अध्यक्ष मुरली विवेकानंद म्हणाले.

हे ही वाचा:

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

पाकिस्ताननंतर श्रीलंकेच्या संसदेत येणार अविश्वास ठरावाचा प्रस्ताव

गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शरद पवारांनी पुन्हा केला बाबासाहेब पुरंदरेंना विरोध

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चैन्नईच्या software-as-a-service company (SaaS) Kissflow या कंपनीने आपल्या पाच वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी सुमारे एक कोटी किमतीच्या BMW कार भेट दिल्या होत्या.

Exit mobile version