केमिकल कंपनीत काल आग, तर आज गोडाऊनने पेट घेतला

केमिकल कंपनीत काल आग, तर आज गोडाऊनने पेट घेतला

मुळशीच्या औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला काल भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून जवळपास १५ महिलांसह १८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण आता या गोडाऊन मधील साहित्याने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केलीये, अशी माहिती आहे.

पुण्यातील मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला काल भीषण आग लागली होती. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवून कुलिंगचे काम सुरु होते. पण, आज सकाळपासूनच कंपनीच्या गोडाऊन मधील साहित्याने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केलीये. सध्या येथे अग्निशमन दलाची कोणतीही यंत्रणा घटनास्थळी नाही. रात्री उशिरा कुलिंग झाल्यानंतरही आता पुन्हा आग पेटतीये.

या कंपनीतील आगीत होरपळून तब्बल १८ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तब्बल १५ महिलां कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर डीएनए टेस्ट केल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. डीएनए टेस्ट पूर्ण होण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर या कर्मचाऱ्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात येईल.

संबंधित घटना ही उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या कंपनीत घडली. सोमवारी (७ जून) दुपारी अडीचच्या सुमारास या कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दुरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. संबंधित कंपनी ही क्लोरिफाईडची असल्याने आग अधिकच भडकली. आगीमागील नेमकं खरं कारण काय? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

हे ही वाचा:

नव्या कोरोना रुग्णांची संख्या लाखापेक्षा कमी

समन्वय प्रतिष्ठानमार्फत ३००० ठाणेकरांचे लसीकरण

एकीकडे वाफा, दुसरीकडे तोहफा…

ईश्वर सेवेबद्दलचा संभ्रम का वाढवत नेताय?

वॉटर प्युरीफायरसाठी लागणारं क्लोराईड नावाचं केमिकल बनवणारी ही कंपनी होती. आगीनंतरही कंपनीत क्लोरीन, क्लोराईडचे बॉक्स दिसत आहेत. केमिकल कंपनी असल्यामुळे आग जास्त धुमसली. जिल्हाधिकाऱ्यांनी आगीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, कंपनीच्या मालकांनी आगीत १७ जण गमवल्याची तक्रार केली होती. १८ जणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले आहेत.

Exit mobile version