तब्बल सात दशकांनंतर भारतात भूमीत चित्ते परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त नामिबियातून आणलेले आठ चित्ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभयारण्यात सोडण्यात आले आहेत. नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने कुनो अभयारण्यात आणण्यात आले.
नामिबियातून आठ चित्ते आज भारतात आणण्यात आले आहेत. सत्तर वर्षानंतर हे चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. एकूण आठ चित्ते असून त्यात चार मादी आणि तीन नर आहेत. नामिबियाहून विशेष बोईंग ७४७-४०० विमानाने मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे चित्त्यांचं आगमन झालं आहे. ग्वाल्हेरहून चित्त्यांना हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलं गेलं. नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचं एक पथक या चित्त्यांसोबत होतं.
PM Modi releases 8 cheetahs in MP's Kuno National Park
Read @ANI Story | https://t.co/NVlXzeiKWp#CheetahIsBack #Cheetahs #NarendraModi #PMModi pic.twitter.com/vmUMwm4yHm
— ANI Digital (@ani_digital) September 17, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चित्ते कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आले आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी या चित्त्यांचे फोटो देखील काढले. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असून कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. चित्त्यांसाठी १२ किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. त्यांचं निरीक्षण करून त्यांना मोठ्या परिसरात सोडण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
‘जॉन्सन बेबी पावडर’चा उत्पादन परवाना कायमचा रद्द
आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना एसीबीकडून अटक
चित्ता हा एकमेव मोठा मांसाहारी प्राणी आहे जो भारतातून पूर्णपणे नष्ट झाला आहे. मात्र, आता देशात पुन्हा चित्ते आणल्यामुळे हे चित्ते भारतात कसे राहणार याकडे लक्ष असणार आहे. चित्ते मोकळ्या मैदानात राहतात, त्यांचा अधिवास हा मुख्यतः त्यांची शिकार जिथे राहतो तिथे असतो.