‘स्टोरीटेल’ या ऍप वर जयेश मेस्त्री आणि श्रीपाद जोशी लिखित ‘चेकमेट’ ही कथा फारच लोकप्रिय ठरली आहे. हे ऍप कथा, कादंबरी व अनेक पुस्तकांसाठी वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. अनेक नामंकित लेखकांचे दर्जेदार साहित्य ऑडिओ फॉर्मेटमध्ये या ऍपवर उपलब्ध आहे. ज्यामुळे अनेक रसिकांची साहित्यिक भूक भागत आहे. त्यामध्ये ‘चेकमेट’ ही कथा नंबर १ वर ट्रेंड होत आहे.
जयेश मेस्त्री आणि श्रीपाद जोशी यांनी चेकमेट या कथेचे लिखाण केले आहे. ही कथा सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. १७ जून २०२१ रोजी ही कथा प्रदर्शित झालेली ही कथा थोड्याच काळात वाचकांच्या पसंतीस पडली आहे. इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान हे या कथेचं प्रमुख पात्र आहे. त्याच्या भोवती कथानक फिरते.
याविषयी आपले मत मांडताना लेखक जयेश मेस्त्री म्हणतात, “चेकमेट लिहिताना आमच्यासमोर सर्वात मोठं चॅलेन्ज होतं ते अभिमन्यूचं. अभिमन्यू म्हणा, त्याची फियान्से रेणुका किंवा कॉन्स्टेबल पाटील, फॅरेन्सिक लॅबचे डॉ. सिब्बल… या सर्वांचे कॅरेक्टर्स मर्डर केसमध्ये डेव्हेलप झाले होते. मर्डर केसला जो प्रतिसाद मिळाला, तो खाली पडू द्यायचा नव्हता. रसिकांना नाराज करायचं नव्हतं. म्हणून आम्ही खूप काळजी घेतली. प्रत्येक सीन्समध्ये प्लॉट पॉइंट्स येतील, थ्रिल निर्माण होईल याची दक्षता घेतली. आणि खरं सांगायचं तर खूप मजा आली. अभिमन्यूवर लोकांनी खूप प्रेम केलं. आस्ताद काळेने सुद्धा कथा उत्तमरित्या नरेट केली आहे.”