मुंबईत निकृष्ठ दर्जाची रस्त्याची कामे करण्यात येत असून या कामांचे कॉलिटी ऑडिट करा तसेच निकृष्ठ दर्जाची कामे करणा-या कंत्राटदारांची चौकशी करा, अशी मागणी करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज (१३ डिसेंबर) पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. आशिष शेलार यांनी ट्वीटकरत याची माहिती दिली.
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील सांताक्रुझ येथील भार्गव रोड या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याचे केलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नव्याने बांधलेल्या रस्त्याला तडा गेल्या आहेत, सिमेंट निघून खडी बाहेर पडून रस्ता पुन्हा खराब झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी पालिका आयुक्तांना सांगितले.
हे ही वाचा :
ठाकरे आता दोन ‘शिफ्ट’मध्ये काम करणार ?
“कुंभमेळा म्हणजे एकतेचा भव्य यज्ञ; यात जातीचे भेद नाहीसे होतात”
अश्विनी भिडेंची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती
ठाणे मनपा ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंना तीन पदके
अशाच प्रकारे मुंबईत अन्य ठिकाणी जी कामे सुरू आहेत ती योग्य दर्जाची होत आहेत का?, कामांचे कॉलिटी ऑडिट करण्यात येते का?, याकडे आशिष शेलार यांनी लक्ष वेधले. आशिष शेलार ट्वीटकरत म्हटले, यावेळी गेल्या वर्षभरापासून मुंबईत सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ते काँक्रीटीकरणाबद्दल पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली.
यासंदर्भात नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत असून यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करावे आणि कामाच्या गुणवत्तेची, कंत्रादारांकडून कामात राहणाऱ्या त्रुटींची तपासणी होऊन संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर दंडात्मक कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
आज मुंबई महापालिका आयुक्त मा. श्री. भूषण गगराणी यांची बी.एम.सी. ऑफिस येथे भेट घेतली.
यावेळी गेल्या वर्षभरापासून मुंबईत सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ते काँक्रीटीकरणाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भात नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत असून यासाठी एक विशेष तपास पथक… pic.twitter.com/hajcWRtEDQ
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 13, 2024