रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे हे प्रसिद्ध आहे. चवदार तळ्याला एक ऐतिहासिक ओळख आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनामुळे चवदार तळ्याची ओळख ही केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरातील तमाम नागरिकांना आहे. पण हे प्रसिद्ध असे चवदार तळे सध्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. याचं कारण आहे चवदार तळ्यातील दिसू लागलेल्या १४ विहिरी!
जुलै महिन्यात झालेल्या धुवाधार पावसाने संपूर्ण कोकण पट्ट्याला झोडपून काढले. या अतिवृष्टीमुळे कोकणातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. महाडही त्याला अपवाद नाही. २२ जुलै रोजी महाड येथे भीषण पूर आला होता. या पुरामुळे महाडमधील तमाम पाण्याचे साठे दूषित झाले. यात चवदार तळ्याचाही समावेश आहे.
हे ही वाचा:
नारायण राणेच्या नादी लागू नका…नाही तर मला सगळेच बोलावे लागेल
अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे
द एम्पायर या वेबसिरीजवर त्वरित बंदी घाला
‘कोळी समाजाला हद्दपार करण्याचे शिवसेनेचे कारस्थान’
चवदार तळ्यातील दूषित पाण्याचा उपसा करून साफसफाईचे काम महाड नगर परिषदेने हाती घेतले आहे. पण या कामा दरम्यान चवदार तळ्याखाली असलेल्या १४ विहिरी दिसू लागल्या आहेत. आजच्या पिढीसाठी या विहिरी म्हणजे आश्चर्याची बाब ठरत आहेत. कारण अनेक तरुण-तरुणींना या विहिरींच्या बद्दल माहितीच नव्हती. त्यामुळे सध्या चवदार तळ्यातील या विहिरी बघण्यासाठी लोकांची गर्दी होताना दिसत आहे.