चॅटजीपीटी आणि एआयची जगभरात चर्चा असून या तंत्रज्ञानाचा वापरही वाढला आहे. अशातच बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात ChatGPTने चक्क गाणं लिहून दाखवलं. एवढंच नाही, तर एका बँडने थेट ते लाईव्ह परफॉर्म देखील केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.
सायफर २०२३ या इव्हेंटमध्ये बंगळुरूतील स्वरात्मा या बँड ग्रुपने परफॉर्मन्स केला होता. या ग्रुपने मंचावरच ChatGPT ला एक आठ ओळींचे गाणे लिहायला सांगितले. या सूचना मिळताच अगदी काही वेळातच एआयने गाणं लिहून दिलं. त्यानंतर तेच गाणे स्वरात्मा या ग्रुपने लाईव्ह परफॉर्म केलं. यानंतर उपस्थितांमध्ये आश्चर्याचे भाव होते तर या कार्यक्रमाचा व्हिडीओ एक्स या सोशल मीडियावर टाकताच व्हिडीओ व्हायरल होत आहे. चॅटजीपीटीने यावेळी समोर बसलेल्या प्रेक्षकांमधील एका महिलेवर गाणं लिहिलं. या महिलेबाबत थोडी माहिती देऊन, तिने लाल ड्रेस परिधान केला असल्याचं चॅटजीपीटीला सांगण्यात आलं. त्यानंतर लगेचच गाणं तयार करण्यात आलं.
Swarathma singing to a song generated by ChatGPT at an AI conference is @peakbengaluru #Cypher2023 @Swarathma pic.twitter.com/qx2F7Q0FiA
— Pritam Bordoloi (@PritamBordoloi) October 12, 2023
हे ही वाचा:
चेपॉकमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला चेपले
शेतजमिनीच्या वाटणीतून चुलत भावाची हत्या!
देशातील सहा टक्के नागरिक खटल्यांमध्ये गुंतलेले!
कांदिवलीमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू
एक्सवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर युजर्सविविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. सायफर २०२३ या इव्हेंटमध्ये अनेक प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान सादर करण्यात आले. याठिकाणी ‘जेन एआय’ची टीम जेनपॅक्ट देखील आली होती. या इव्हेंटला भारतातील सर्वात मोठी एआय समिट म्हटलं जात आहे. या इव्हेंटला प्रसिद्ध क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स हादेखील उपस्थित होता.