बहुप्रतीक्षित अशी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) ही स्पर्धा उद्यापासून सुरू होणार आहे. दहा संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून येत्या २२ मार्चपासून आयपीएलचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नईमधील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चँलेंजर्स बंगळूर दरम्यान होणार आहे. अशातच यंदा कोणता संघ उत्कृष्ट कामगिरी करणार? कोणता खेळाडू चमकणार आणि कोणता संघ शेवटला राहणार याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) प्लॅटफॉर्म असलेल्या चॅट जीपीटीनेही सहभाग घेतला आहे.
चॅट जीपीटी हे अल्पवधीतच प्रसिद्ध झालेले एआय चॅट प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मने आयपीएल २०२४ च्या विजेत्या संघाबद्दल मत मांडले आहे. चॅट जीपीटीनुसार, इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ यशस्वी कामगिरी करणार आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू फारशी चांगली कामगिरी करू शकणार नाही. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकदा जिंकण्यासाठी आघाडीवर असणार आहेत.
आयपीएल २०२४ च्या विजेत्याबद्दल चॅट जीपीटीला विचारले असता, चॅट जीपीटीने उत्तर दिले की, “संघ, खेळाडू आणि कामगिरी पाहता चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स सर्वोत्तम संघ आहेत. या संघांच्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात सातत्य आहे. यामुळे दोन्ही संघ प्रबळ दावेदार म्हणून समोर आहेत. परंतु, आयपीएलमध्ये कोणताही संघ दमदार कामगिरीच्या जोरावर विजयी होऊ शकतो.”
हे ही वाचा:
केजरीवाल यांना वाटू लागली अटकेची भीती!
चीनची भागीदारी असलेल्या पाकमधील ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला
जर पुन्हा औरंगजेबाशी तुलना कराल तर अन्य दोन कबरी खोदाव्या लागतील!
आरोपी साजिदची आई म्हणाली, एन्काउंटरमध्ये मुलाच्या मृत्यूचे दु:ख नाही!
चॅट जीपीटीने आपल्या उत्तरात असेही म्हटले आहे की, “एम. एस. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाकडे अनुभवी खेळाडू आहेत. तसेच त्यांचा संघ समतोल राखणारा आहे. या संघात मोईन अली, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरसारखे अनुभवी खेळाडू आहे. यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही पातळीवर हा संघ चांगला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली हा संघ चांगला तयार झाला आहे.”