चारधाम यात्रेत १५ दिवसांत २०० कोटींहून अधिक व्यवसाय!

भाविकांची संख्या १० लाखांहून अधिक

चारधाम यात्रेत १५ दिवसांत २०० कोटींहून अधिक व्यवसाय!

चारधाम यात्रेसाठी आलेल्या भाविकांमुळे येथील व्यवसाय गेल्या हंगामापेक्षा दुपटीने वाढला आहे. विशेषतः हॉटेल, ढाबे, वाहतूक आदींशी संबंधित व्यावसायिकांनी १५ दिवसांत चांगला व्यवसाय केला आहे. एका अंदाजानुसार, आतापर्यंत २०० कोटींहून अधिक व्यवसाय झाला आहे. तर भाविकांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा पार केला आहे.

चारधाम यात्रेसाठी यंदा विक्रमी भाविक पोहोचले असल्याचे माहिती विभागाचे महासंचालक बंशीधर तिवारी यांनी सांगितले. या भाविकांच्या पुरामुळे ताण वाढला असला तरी व्यावसायिकांचा छान व्यवसाय झाला. १५ दिवसांच्या आत चारधामांमध्ये हॉटेल, ढाबे, वाहतुकीशी संबंधित विविध व्यावसायिकांनी २००कोटींहून अधिक व्यवसाय केला. एकट्या गढवाल मंडळ विकास निगमने २२ कोटी रुपयांची कमाई केली. शिवाय, कर आणि अन्य प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कमाई यापेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे.

हे ही वाचा:

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पाचही टप्प्यांतील मतदानाची आकडेवारी जाहीर!

राजकोट दुर्घटनेप्रकरणी गेम झोन मालकासह तिघांना अटक!

खानदानी मस्तवालपणा उतरवला!

‘१५ कोटी पार…’ वाले मतदार कोणाच्या बाजूला???

चारधाम हॉटेल असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अजय पुरी यांनी सांगितल्यानुसार, गंगोत्री घाटीमध्ये सुमारे ४०० आणि यमुनोत्री घाटीमध्ये ३०० हॉटेल, होम स्टे आणि धर्मशाळा आहेत. बद्रीनाथ हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश मेहता यांनी सांगितले की, श्रीनगर ते बद्रीनाथ आणि रुद्रप्रयाग ते केदारनाथपर्यंत ८५० हॉटेल, होम स्टे आणि धर्मशाळा आहेत. गेल्या वर्षी २२ एप्रिलला हंगामाची सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला कमी यात्रेकरू आले होते. मात्र यंदा हंगामाला उशीरा सुरुवात झाल्यांतर दोन ते तीन पट अधिक गर्दी लोटली आहे.

हॉटेल, ढाबे आणि होम स्टेमधून ८० कोटी, दुकानदारांची २० कोटी, घोडे, खच्चर, गाइड आदींनी ३० कोटींहून अधिक तर, वाहतुकीच्या माध्यमातून म्हणजे ट्रॅव्हल व्यावसायिकांची ३० कोटींची कमाई झाल्याचे सांगितले जाते. पार्किंग, प्रवेश करासह अन्य कर आणि मंदिर समिती ते तीर्थक्षेत्रातील पुरोहितांचीही चांगली कमाई झाली आहे.

Exit mobile version