वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम टप्प्यात डॉक्टरकीची शपथ दिली जाते. पारंपारिक पद्धतीने देण्यात येणारी ही शपथ हिप्पोक्रॅटिक ओथ (Hippocratic Oath) म्हणून संबोधली जाते. मात्र, आता या शपथ नावात बदल होणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात चर्चा सुरू आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आता चरक शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे. भारतीय डॉक्टरांनी ग्रीक वैद्याची शपथ घेण्यापेक्षा भारतीय वैद्य असलेल्या चरक यांच्या नावे शपथ घ्यावी, असा प्रस्ताव केंद्रात समोर येणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात चर्चा सुरू आहे. डॉक्टरांनी पांढरा कोट परिधान करण्यापूर्वी चरक यांची शपथ घ्यावी, असा विचार सुरू आहे.
सध्या भारतीय डॉक्टर्स ग्रीक परंपरेनुसार शपथ घेतात. यामध्ये बदल होण्याची शक्यता वाढली आहे. व्हाईट कोट सेरेमनीच्या वेळी ही शपथ दिली जाते. नॅशनल मेडिकल काऊन्सिलच्या बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव चर्चेला आला आहे. अधिकृतपणे शपथ बदलण्यात यावी, असी माहिती समोर आली आहे. भारतीय आयुर्वेदाचे जनक असणारे चरक यांच्या नावाने ही शपथ देण्यात यावी.
हे ही वाचा:
‘काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी संजय राऊत वाटेल ते बोलू शकतात’
पत्रकार राणा अय्यूब यांची १.७७ कोटी रक्कम ईडीने गोठवली
खबरदार ! रेल्वेच्या दिव्यांग डब्यातून प्रवास कराल तर…
लता दीदींच्या स्मारकावरून राजकारण नको, मंगेशकर कुटुंबियांचे आवाहन
हिप्पोक्रॅटिक ओथ ही एखाद्या रुग्णावर त्याच्या क्षमतेनुसार उपचार करणे आणि इतर गोष्टींबरोबरच रुग्णाच्या गोपनीयतेचे रक्षण करण्याशी संबंधित आहे. शतकानुशतके, जगभरातील डॉक्टर ही शपथ घेता आहेत. डॉक्टर हे रुग्ण सेवेसाठी येण्याच्या मार्गावर असताना त्यांना ही शपथ घ्यावी लागते.