केदारनाथ-बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे चारधाम यात्रेला ब्रेक

सतत बर्फवृष्टी , तापमान उणे तीन अंशांवर

केदारनाथ-बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे चारधाम यात्रेला ब्रेक

उत्तराखंडमध्ये एकीकडे हवामानाचा लहरीपणा कायम आहे, तर दुसरीकडे चारधाम यात्रेसाठी आलेल्या भाविकांसाठी हवामान मोठे आव्हान ठरत आहे. धाममध्ये सतत बर्फवृष्टी होत आहे. हिमवृष्टीमुळे धाम येथील तापमान सायंकाळी उणे तीन अंशांवर पोहोचत आहे. त्यामुळे पायी जाणाऱ्या भाविकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये खराब हवामानामुळे चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

श्रीनगरमध्ये राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था आहे, प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हवामानात सुधारणा होताच प्रवाशांना प्रवास सुरू करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले. केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टीनंतर तापमानात सातत्याने घटत असल्याने मोठ्या प्रमामनावर थंडीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी वृद्ध भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. केदारनाथ धाममध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

हवामान खात्याने चारधाममध्ये ३ मेपर्यंत हिमवृष्टीचा इशाराही दिला आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊनच पुढच्या प्रवासाची योजना आखावी असे आवाहन रुद्रप्रयाग पोलिस आणि प्रशासनानेही भाविकांना केले आहे. बाबा केदारच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी १ मे नंतरच नोंदणी करावी, असे आवाहन सरकारने केले आहे कारण १ मे रोजी बाबा केदारच्या दर्शनासाठी सुमारे ३० हजार लोकांनी नोंदणी केली आहे.

बर्फवृष्टीनंतर तापमानात सातत्याने घट होत आहे, त्यामुळे थंडी चांगलीच वाढली असून, त्यामुळे वृद्ध यात्रेकरूंच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. केदारनाथ धाममध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या यात्रेकरूंच्या मृत्यूचे कारण थंडी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. सायंकाळच्या वेळी तापमान उणे ४० अंश पोहोचत आहे. अशा स्थितीत प्रवाशांना आपल्या प्रवासात अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक प्रवाशांवर उपचार करण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

लुधियानात गॅस गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू !

मन की बात.. हा माझ्यासाठी श्रद्धा, उपासना, अहम ते वयमचा प्रवास!

अमली पदार्थ विरोधी मोहिमेत पाच दिवसांत २०६ जणांना अटक

त्रिपुरात अल्पवयीन पत्नीची हत्या करून तुकडे भरले बॅगेत

सोनप्रयागमधील नोंदणी तपासल्यानंतर प्रवाशांना पुढे पाठवले जात आहे. गेल्या पाच दिवसांत ७० हजारांहून अधिक भाविकांनी बाबा केदाराचे दर्शन घेतल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचवेळी प्रवाशांच्या गर्दीमुळे सोनप्रयागमध्ये कोंडी झाली आहे.

Exit mobile version