जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत आज हाणामारीचे चित्र पाहायला मिळाले. जम्मू-काश्मीरमध्ये कलम-३७० पुनर्स्थापित करण्याची मागणी करण्याचा प्रस्ताव काल विधानसभेत मंजूर झाल्यानंतर वादाची ठिणगी पडली होती. भाजपाने याला कडाडून विरोध करत घोषणाबाजी केली होती आणि आज याचे रुपांतर हाणामारीत झाल्याचे पाहायला मिळाले.
तुरुंगात असलेले बारामुल्ला लोकसभा खासदार अभियंता रशीद यांचे भाऊ आणि अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम-३७० पुनर्संचयित करण्यासाठी सभागृहात बॅनर आणले आणि सभागृहाच्या मधोमध उभे राहून झळकावले. बॅनरमध्ये कलम ३७० पुनर्स्थापित करण्यासंदर्भात गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या, त्यानंतर भाजप आमदारांनी बॅनरच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला. विरोध इतका वाढला की, विधानसभेत गदारोळ आणि जोरदार वादावादी सुरू झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.
हे ही वाचा :
लोकसभेच्या पराभवानंतर भाजपाने केले मायक्रो मॅनेजमेन्ट!
उबाठाचे नेते भास्कर जाधव काँग्रेसवर वैतागले
बाबा सिद्दीकीच्या निकटवर्तीयांना जीवे मारण्याची धमकी
सदनिकेची विक्री केली, पण खरेदीदाराला मूळ कागदपत्रे न देताच घेतले गृहकर्ज
विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी बॅनरवर आक्षेप घेतला. बॅनर पाहून भाजप आमदार संतापले आणि शेख खुर्शीद यांच्या हातातील पोस्टर हिसकावून फाडून टाकले. यानंतर वाद आणि बाचाबाची झाली. त्यामुळे सभागृहाचे अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांनी कामकाज काही काळासाठी तहकूब केले.