भगवान रामाचा फोटो असलेल्या प्लेटमधून बिर्याणीची विक्री?

नागरिकांकडून संताप, आरोपीला अटक

भगवान रामाचा फोटो असलेल्या प्लेटमधून बिर्याणीची विक्री?

दिल्लीतील जहांगीरपुरी येथील एका बिर्याणी विक्रत्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.प्रभू रामाचा फोटो असलेल्या कागदी प्लेट्समधून बिर्याणीची विक्री करत असल्याचा आरोप या विक्रेत्यावर करण्यात आला आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे.सध्या जहांगीरपुरी पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

ही घटना रविवारी(२२ एप्रिल) घडल्याचे सांगण्यात येत आहे.स्थानिक हिंदू संघटनांनी बिर्याणीच्या दुकानात ठेवलेल्या प्लेट्सवर भगवान रामाचा फोटो पाहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली.प्रभू रामाच्या प्लेट्समधून लोकांना बिर्याणी देत असल्याचे आणि या प्लेट्स वापरल्यानंतर कचरापेटीत टाकून देत असल्याचे संघटनांच्या लोकांनी पाहिले.याबाबत त्यांनी विक्रेत्याशी चौकशी केली.यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

हे ही वाचा:

कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याचा दावा; मुलीची हत्या ही ‘केरळ स्टोरी’ प्रमाणेचं!

‘काँग्रेसच्या काळात हनुमान चालीसा ऐकणे सुद्धा गुन्हा’

न्यायालयाची नवी अट; पतंजलीच्या जाहिरातीएवढीच जाहिरात देऊन माफी मागा!

सलमान खान गोळीबार प्रकरणातील दुसरी पिस्तुल सापडली !

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भगवान रामाच्या फोटो असलेल्या चार प्लेट्सचे पॅकेट जप्त केले आहेत.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, खाद्यपदार्थ विकण्यासाठी धार्मिक भावना दुखावल्याचे उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Exit mobile version