अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांचा वाजणार शंख!

पुण्यातील केशव शंखनाद पथकाला मिळाले निमंत्रण

अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांचा वाजणार शंख!

अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्री रामांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांनी बनवलेले वस्त्र वापरण्यात येणार आहे.’दो धागे श्री राम के लिए’ या मोहिमेअंतर्गत हजारो लोक प्रभू रामासाठी हातमागावर कपडे विणत आहेत.यासह पुणेकरांना अजून एक मान मिळाला आहे.तो म्हणजे प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शंखनाद करण्यासाठी पुण्यातील केशव शंखनाद पथकाला खास निमंत्रित करण्यात आलं आहे.

पुण्यातील केशव शंखनाद पथक आता अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात शंख नांद करणार आहे. श्री राम जन्मभूमी क्षेत्राचे महामंत्री चंपत राय यांनी पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांना पत्र दिलं आहे.एकीकडे श्रीरामांच्या मूर्तीचे वस्त्र हे खास पुण्यात बनत आहे तर दुसरीकडे केशव शंखनाद पथकातील १११ वादक हे अयोध्येत जाऊन शंखनाद करणार आहेत.ही बाब पुण्यासाठी खूपच अभिमानाची मनाली जात आहे.

हे ही वाचा:

मालदीवमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी!

सनातन धर्माविरोधात बोलणाऱ्यांबद्दल राहुल गांधी गप्प का ? बीआरएसच्या के. कविता यांचा सवाल

इस्राइलच्या बॉम्बवर्षावात गाझातील ७० लोक ठार

‘न्यूज क्लिक’ प्रकरणी एचआर विभागाचे प्रमुख सरकारी साक्षीदार होण्यास तयार

नितिन महाजन यांनी सांगितले की, पुणे येथील मंदिरांमध्ये ‘शंखनाद’ अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. केशव शंखनाद टीममध्ये ५०० जण संगीतमय शंखाचा निनाद करतात. त्यात ९० टक्के महिला आहेत. अगदी ५ वर्ष वयापासून ते ८५ वर्ष वयापर्यंतचे सदस्य टीममध्ये आहे. यासाठी टीमचे १११ सदस्य १८ जानेवारी रोजी अयोध्यात पोहचणार आहे. पुणे शहरात सुरु असलेली ‘दो धागे श्री राम के लिए’ ही मोहीम एकूण १३ दिवस चालणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र आणि हेरिटेज हँडविव्हिंग रिव्हायव्हल चॅरिटेबल ट्रस्ट ऑफ पुणे यांच्यातर्फे हे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात १० डिसेंबरपासून करण्यात आली आहे. मोहीम संयोजक अनघा घैसास यांनी प्रभू रामासाठी चालवल्या जाणार्‍या या मोहिमेत लोकांच्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल सांगितले. ते म्हणाले की, या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सुमारे १० लाख लोकांनी नोंदणी केली आहे.

Exit mobile version