31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषबेस्टच्या बदललेल्या मार्गिकांमुळे बेस्ट समितीत वादळ

बेस्टच्या बदललेल्या मार्गिकांमुळे बेस्ट समितीत वादळ

Google News Follow

Related

बेस्टने १ सप्टेंबर पासून केलेल्या वेळापत्रक बदलाने मुंबईकर चांगलाच त्रस्त झालेला आहे. मुंबईमध्ये सध्याच्या घडीला अनेकांची मदार केवळ बसवरच आहे. तसेच सध्याच्या घडीला सरसकट सर्वांना लोकलप्रवास मुभा नसल्याने, सामान्यांचे हाल होताहेत. बेस्ट समितीत याचे पडसाद उमटले आणि सदस्यांनी या बदललेल्या वेळापत्रकाला तीव्र विरोध दर्शविला.

शिवाय बेस्टने बदल केलेल्या वेळापत्रकानुसार ४५ मार्ग खंडित करण्यात आलेले आहेत. तर २३ मार्ग चक्क बंद केलेले आहेत. प्रवाशांना यासंदर्भात कुठल्याही आगाऊ सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळेच आता बेस्ट समितीच्या बैठकीत वादळी चर्चा घडली. यामध्ये सर्वांनीच या वेळापत्रक बदलाला विरोध दर्शविला आहे.

मुंबईत आताच्या घडीला ४८४ मार्गांवर बस सेवा देण्यात येत होती. परंतु वेळापत्रक बदलांमुळे ही संख्या चांगलीच रोडावली आहे. आता केवळ ४१९ मार्गांवर बस सेवा मिळत आहे. त्यामुळेच प्रवासी चांगलेच हतबल झालेले आहेत. मुख्य म्हणजे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती न मिळाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होताहेत. अनेक बेस्टच्या वेळापत्रकात बदल केला आहे. तसेच १५ नवे बसमार्ग, सहा बसमार्गांचा विस्तार, ४५ बसमार्ग रद्द केलेत. प्रवाशांचा प्रतिसाद आदी घटक लक्षात घेऊन बदल केल्याचे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे. या बदलाचा फटका केवळ सामान्य प्रवाशीच नाही तर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गालाही चांगलाच बसलेला आहे.

हे ही वाचा:

आधी आरोग्य मंदिरं उघडतील, मंदिरे नंतरच!

राज्याने केले हात वर; महापालिकांना करावा लागणार तिसऱ्या लाटेत खर्च

‘आधी चोऱ्या करायच्या आणि नंतर बहाणे करायचे’ दरेकरांचा मलिकांवर पलटवार

मुंबई महानगरपालिकेचे ५१ कोटीचे दोन पदपथ

बेस्ट समितीच्या बैठकीत वेळापत्रक बदलावर मुख्य चर्चा झाली. तसेच समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी कोणतेही कामकाज न करता सभा तहकुबीची सूचना मांडली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा