27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषथांब्यावर उभ्या असलेल्या लोकांना 'बेस्ट' बसेसचा ठेंगा

थांब्यावर उभ्या असलेल्या लोकांना ‘बेस्ट’ बसेसचा ठेंगा

Google News Follow

Related

मुंबईत सध्याच्या घडीला सरसकट सर्वांना लोकलप्रवास मुभा नसल्याने, सामान्यांचे हाल होताहेत. त्यामुळेच आता मुंबईकरांची मदार केवळ बेस्टवर अवलंबून आहे. परंतु १ सप्टेंबरपासून बेस्ट उपक्रमाने बसच्या मार्गात केलेल्या बदलांमुळे प्रवासी चांगलेच संतप्त झालेले आहेत. बदललेल्या मार्गिकेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडालेला आहे. एकीकडे लोकल निर्बंध त्यामुळे सर्वसामान्यांना कार्यालय गाठण्यासाठी आता बेस्ट शिवाय पर्याय उरलेला नाही. शिवाय सध्या बेस्टमध्ये केलेल्या बदलानुसार लांब पल्ल्याचे मार्ग कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे लांबचा पल्ला गाठणारे प्रवासी चांगलेच वैतागले आहेत.

पुर्व द्रुतगती मार्गावरुन मुलूंड ते शिवडी अशी ३६८ क्रमाकांची बस आणि पश्‍चिमेकडून आता सुरु केलेली आहे. त्यामुळे अनेकांना पुर्व द्रुतगती मार्गावर बराच काळ ताटकळत राहावे लागत आहे. तसेच काहीसे वरळी येथून सुटणारी मुलुंडची बसचा मार्गही बदलण्यात आलेला आहे. मुख्य म्हणजे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती न मिळाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होताहेत. अनेक बेस्टच्या वेळापत्रकात बदल केला आहे. तसेच १५ नवे बसमार्ग, सहा बसमार्गांचा विस्तार, ४५ बसमार्ग रद्द केलेत. प्रवाशांचा प्रतिसाद आदी घटक लक्षात घेऊन बदल केल्याचे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

‘पांढऱ्या हत्तीं’वर अनधिकृत फेरीवाल्यांनी मांडले ठाण

अरेरे! ‘त्या’ अंगरक्षकाने अखेर बोट गमावले

सिद्धार्थच्या निमित्ताने नवी चिंता; युवकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण का वाढते आहे?

पाच महिन्यांची गर्भवती खेळतेय व्हॉलीबॉल

दक्षिण मुंबईतील ८३, ८४ हे मार्ग बंद केल्याने प्रवाशांकडे कोणताच पर्याय राहिलेला नाही. ६६ क्रमांकाच्या मार्गातही बदल केल्याने प्रवाशांना मधल्याच थांब्यावर उतरुन पायी चालत जावे लागत आहे. बेस्टने कॉरिडॉर सी बसमार्गाची पुर्नरचना केली असून काही मार्गावरील बस थेट उड्डाणपुलांवरुन नेण्यास सुरुवात केल्याने पुलाखालील बसथांब्यावरील प्रवाशांचे हाल होत आहेत. ७ आणि २२ मर्यादित हे जे. जे. उड्डाणपुलाखालून जाणारे बसमार्ग बंद केले आहेत. परिणामी कुर्ला, विक्रोळी, मरोळ येथे जाणाऱ्या प्रवाशांना अन्य पर्याय आता उपलब्ध नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा