१० बस बदलल्या, वेगवेगळे कपडे घातले.. बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट संशयितांची माहिती समोर!

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

१० बस बदलल्या, वेगवेगळे कपडे घातले.. बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट संशयितांची माहिती समोर!

बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटातील संशयिताचा शोध अजूनही सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रुकफील्ड परिसरात झालेल्या स्फोटातील संशयिताने अनेक वेळा बस बदलल्या आणि पळून जाण्यासाठी त्याचे स्वरूपही बदलले.नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) संशयित आरोपी कोणत्या मार्गाने गेला त्या मार्गाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजनुसार, बेल्लारीला जाण्यासाठी त्याने दोन ठिकाणी इतर राज्यात जाणाऱ्या सरकारी बसमध्ये चढल्याचे दिसले.

इंडियन एक्स्प्रेसशी संबंधित जॉन्सन टीएने दिलेल्या वृत्तानुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसते की, संशयित आरोपी कॅफेच्या अगदी जवळ व्होल्वो बसमध्ये चढला. यानंतर त्याने कॅफेपासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर कपडे बदलले. यापूर्वी त्याने बेसबॉल कॅप आणि शर्ट घातला होता. मग त्याने आणखी एक टी-शर्ट घातला.पोलिसांनी सांगितले की, आम्हाला बेसबॉल कॅप मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहे.ही टोपी आता या तपासातील महत्त्वाचा पुरावा आहे.

हे ही वाचा :

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनात ‘उघडपणे’ शस्त्र बाळगण्यास परवानगी!

महिला झाल्या सबल, देशाची वाढली ताकद!

इंग्लंडची निराशाजनक कामगिरी पाहून नासिर हुसैन संतापले!

१५० उमेदवारांची नावे निश्चित होणार; दुसरी यादी १० मार्चला जाहीर होण्याची शक्यता

स्फोटाच्या दिवशी संशयित बेंगळुरूच्या बाहेरून तुमकूरला जाणाऱ्या सरकारी बसमध्ये देखील दिसला होता. तुमकूर हे बेंगळुरूपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. तो टोपीशिवाय बसमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यात आणि बदललेल्या कपड्यांमध्ये कैद झाला. तुमकूरला जाताना तो बसमधून उतरल्याचे समजते. त्यानंतर सुमारे ६ तासांनंतर रात्री ८.५८ वाजता तो बेल्लारी बस स्टँडवर दिसला.

दहा बसेस बदलल्या
संशयित बेल्लारी येथून अन्य काही ठिकाणी जाण्यासाठी बसमध्ये चढला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. जिथून तो कोणत्याही किनारी किंवा उत्तर सीमा भागात जाऊ शकतो. रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्ब ठेवण्यासाठी संशयिताने १० बसेस बदलल्या आणि बॉम्बस्फोटानंतर तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच एनआयएने या संशयिताचे छायाचित्र प्रसिद्ध केले असून त्याच्याविषयी माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे म्हटले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात आले आहे.या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

Exit mobile version