भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे साऱ्यांचे लक्ष असताना आता इस्रोने सोडलेले चांद्रयान- ३ चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं आहे. गुरुवार, १७ ऑगस्ट रोजी चांद्रयानाचं लॅण्डर हे प्रॉपल्शन मॉड्यूलपासून वेगळे होऊन चंद्रावर उतरण्याच्या अंतिम टप्प्यात असणार आहे.
भारताची महत्त्वाकांक्षी अशी चांद्रयान-३ ही मोहिम अंतिम टप्प्यात असून चांद्रयानाने बुधवारी सकाळी ८.३० वाजता आणखी एक मोठा टप्पा पूर्ण केला आहे. लवकरच प्रॉपल्शन आणि लॅण्डर एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. इस्त्रोने ट्विट करत याची माहिती दिली आहे.
इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, सध्या चांद्रयान हे चंद्राभोवती १५३x१६३ एवढ्या कक्षेत फिरत आहे. त्यानंतर गुरुवार, १७ ऑगस्ट रोजी प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. चांद्रयानमध्ये असलेल्या लँडरमध्ये रोव्हर फिट करण्यात आले आहे. प्रॉपक्शन मॉड्यूल हे लँडर मॉड्यूलला चंद्रापासून १०० किलोमीटर उंचीवरील कक्षेत नेणार आहे. यानंतर हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे होणार आहे.
Chandrayaan-3 Mission:
Today’s successful firing, needed for a short duration, has put Chandrayaan-3 into an orbit of 153 km x 163 km, as intended.
With this, the lunar bound maneuvres are completed.
It’s time for preparations as the Propulsion Module and the Lander Module… pic.twitter.com/0Iwi8GrgVR
— ISRO (@isro) August 16, 2023
त्यानंतर लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्यासाठी प्रवास करेल. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान- ३ हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. तसेच ही मोहिम पूर्ण झाल्यास भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरणार आहे.
हे ही वाचा:
विनयभंग प्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटेला अटक !
केंद्र सरकारने ठरवले टॉमेटो विकायचे ५० रुपये किलो दराने!
अजित पवारांसमोरच कार्यकर्त्यांकडून गोंधळ !
हरियाणातील नूह हिंसाचारप्रकरणी गोरक्षक बिट्टू बजरंगीला अटक !
चांद्रयान- ३ पृथ्वीच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करून चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. या दरम्यान चंद्राजवळ प्रदक्षिणा घालताना अंतराळ यानात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने चंद्राचा व्हिडिओ बनवला आणि पृथ्वीवर पाठवला. इस्रोने ट्विटरवर चंद्राची ही पहिली झलक शेअर केली होती. चांद्रयान- ३ हे यान १४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले.