चांद्रयानचा सोशल मीडियाच्या अंतराळातही ‘विक्रम’

यूट्यूब स्ट्रीमिंग लिंकने इतिहास रचला

चांद्रयानचा सोशल मीडियाच्या अंतराळातही ‘विक्रम’

‘चांद्रयान – ३’ च्या यशस्वी लँडिंगकडे भारतासह जगभरातील नागरिकांचे लक्ष होते. या मोहिमेचं इस्त्रोने यू ट्यूबवरुन लाईव्ह प्रेक्षपण केले होते. भारताने इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. इस्रोच्या यूट्यूबवरील लाइव्ह स्ट्रीमिंग लिंकनेही इतिहास रचला आहे. चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगचे लाईव्ह स्ट्रीमिंग एकाच वेळी ८० लाख लोकांनी पाहिले आणि यूट्यूब इतिहासातील सर्व रेकॉर्ड धुवून टाकले आहेत.

याआधी ब्राझील विरुद्ध कोरिया या फुटबॉल सामन्याचे यूट्यूबवर लाइव्ह स्ट्रीमिंग ६१ लाख युजर्सनी एकाच वेळी पाहिलेले होते. दुसऱ्या क्रमांक लागत होतो तो ब्राझील विरुद्ध क्रोएशिया फुटबॉल सामन्याचा. हा सामना एकाच वेळी ५२ लाख युजर्सनी पाहिला होता. मात्र चांद्रयान ३ च्या लाइव्ह स्ट्रीमिंगने मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

९ मिनिटांत २.९ दशलक्ष युजर्स

इस्रोच्या यूट्यूब चॅनेलचे २.६८ दशलक्ष सदस्य आहेत. चांद्रयान-३चे लँडिंग पाहण्यासाठी इस्रोच्या चॅनेलमध्ये अवघ्या नऊ मिनिटांत २.९ दशलक्ष लोकांची भर झाली. ही संख्या वाढता वाढत गेली. तेराव्या मिनिटाला ३.३ दशलक्ष, सतराव्या मिनिटाला ४० लाख आणि ३१ मिनिटानंतर ५.३ दशलक्ष, ४५ मिनिटानंतर ६.६ दशलक्ष. त्यानंतर काही मिनिटांतच ही संख्या ८० लाखांपार पोहोचली.

ट्विटरवर ४ कोटी लोकांनी पाहिला मेसेज

दरम्यान, इस्रोने जेव्हा चांद्रयान चंद्रावर उतरले तेव्हा जो मेसेज X वर केला तेव्हा त्याला गेल्या २४ तासांत ४ कोटी ८० लाख इतके व्ह्यूज मिळाले आहेत तर हे ट्विट रिट्विट करणाऱ्यांची संख्या आहे ती ३ लाख ३१ हजार. या ट्विटला लाइक्स मिळाले आहेत ते ७० हजार.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे झाले आहेत स्वस्तातले पवार

वॅग्नरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन मॉस्को विमान अपघातात ठार की काटा काढला?

वरळीत कोळी महिलांना मासे विक्री करण्यास अडचणी

चांद्रयान- ३ मोहिमेचा प्रवास मोठ्या पडद्यावर दिसणार

 

यूट्यूबवरील सर्वाधिक पाहिलेले लाइव्ह स्ट्रीमिंग

इस्रो ‘चांद्रयान-३’ – ८.०६ दशलक्ष
ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया – ६.१५ दशलक्ष
ब्राझील विरुद्ध क्रोएशिया – ५.२ मी
वास्को विरुद्ध फ्लेमेन्गो – ४.८ मी
SpaceX क्रू डेमो – ४.०८ मी
BTS बटर – ३.७५ मी
सफरचंद – ३.६९ मी
जॉनी डेप विरुद्ध अंबर – ३.५५ दशलक्ष
फ्लुमिनेन्स विरुद्ध फ्लेमेन्गो – ३.५३ मी
कॅरिओका चॅम्पियन अंतिम सामना – ३.२५ मी

Exit mobile version