प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर सापडला ऑक्सिजन आणि काही धातू

ऑक्सिजनसोबत ऍल्युमिनियम, लोह, टिटॅनियम, सल्फर असे पदार्थही तिथे सापडले आहेत.

प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर सापडला ऑक्सिजन आणि काही धातू

भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेला प्रत्येक दिवशी नवनवे यश मिळत आहे. प्रज्ञान रोव्हरने माती परीक्षण करत पृष्ठभागाखाली १० सेमी तापमान किती आहे, याचा अंदाज घेतला होता आता त्याने काही धातू, वायू यांचा शोध घेतला आहे. त्यात ऑक्सिजनचाही शोध त्याला लागला आहे.

 

 

भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ही मोहीम राबवली असून असा प्रयत्न करणारा भारत हा पहिलाच देश आहे. भारताचे चांद्रयान ३ चंद्रभूमीवर अवतरल्यानंतर जगभरातून भारताचे कौतुक झाले.

हे ही वाचा:

पंतप्रधानांची रक्षाबंधन भेट; गॅसच्या किमती २०० रुपयांनी घटल्या

लोकसभेच्या १६० कमकुवत जागा जिंकण्यासाठी अमित शहा सरसावले

‘कलम ‘३५ अ’ ने जम्मू-काश्मीरच्या लोकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले’

काश्मीरमध्ये रंगणार ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा!

 

प्रज्ञान रोव्हरने आता चंद्रावर सल्फर (गंधक) असल्याचे निदान केले आहे. आता या ध्रुवावर हायड्रोजन आहे का, याची पाहणी रोव्हर करणार आहे. पण त्याआधी त्याने ऍल्युमिनियम, कॅल्शियम, लोह (फेरस), क्रोमियम, टिटॅनियम, मँगनिज, सिलिकॉन यांचेही अस्तित्व असल्याचे स्पष्ट केले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) यासंदर्भातील आलेख X वर शेअर करत रोव्हरच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे.

 

रोव्हरकडे एलआयबीएस ही पद्धती असून त्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी असलेली खनिजे शोधली जातात. २८ ऑगस्टला रोव्हर एका खड्ड्याजवळ पोहोचले होते. तो ४ मीटर व्यासाचा खड्डा होता. पण त्याला आदेश दिल्यानंतर तो खड्ड्यापासून दूर गेला. आता त्याने या खनिजांचा शोध घेतला आहे. रोव्हरने हे स्पष्ट केले आहे की, जमिनीच्या पृष्ठभागाखाली जाऊ तसतसे तापमान खूप कमी होत जाते. आता हे सगळे संशोधन आणखी ७ दिवस चालणार आहे. लँडरने रोव्हरला तिथे सोडल्यापासून ८ मीटर इतका प्रवास रोव्हरने केलेला आहे.

Exit mobile version