चांद्रयान ३ ला यशस्वीपणे निर्धारित कक्षेत घेऊन जाणारा लाँच व्हेइकल एलव्हीएम३एम४वरील क्रायोजेनिक भाग बुधवारी पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेत परतला आहे. तो अनियंत्रित आहे. हा भाग उत्तर प्रशांत महासागरात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, रॉकेटच्या या भागाने बुधवारी दुपारी दोन वाजून ४२ मिनिटांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. रॉकेटचा हा परतीचा प्रवास चांद्रयानाने उड्डाण केल्यानंतर १२४ तासांनी सुरू झाला आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानच्या वाईट कामगिरीनंतर बाबर आझम कर्णधारपदावरून पायउतार
गणपतीपुळे येथे जीवनदान दिलेल्या ‘त्या’ व्हेलच्या पिल्लाचा मृत्यू
शमीने भारताला दाखवला अंतिम फेरीचा मार्ग
जम्मू- काश्मीरमधील सैनिकांसोबत स्थानिक महिलांनी साजरी केली भाऊबीज
रॉकेटच्या या अनियंत्रित भागाने परतीचा प्रवास सुरू केला असला तरी यात कोणतीही जोखीम नाही, असे इस्रोने स्पष्ट केले आहे. हा भाग पृथ्वीवर पडून तो अपघातग्रस्त झाल्यास कोणताही मोठा स्फोट होऊ नये, यासाठी त्यातील संबंधित सर्व ऊर्जा स्रोत हटवण्यासाठी महत्त्वाचे असलेली तंत्रे निकामी करण्यात आली आहेत. संयुक्त राष्ट्रे आणि संबंधित आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थांनी अशा अंतराळ कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याला अनुसरूनच इस्रोने सर्वतोपरी काळजी घेतली आहे.