मोदी सरकारने जाहीर केला चांद्रयान-३ च्या उड्डणाचा मुहूर्त

मोदी सरकारने जाहीर केला चांद्रयान-३ च्या उड्डणाचा मुहूर्त

भारताचे महत्त्वाकांक्षी असे चांद्रयान-३ हे पुढल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये लॉन्च होणार आहे. २०२२ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये हे यान लॉन्च होऊ शकते. बुधवार, २८ जुलै रोजी भारताचे विज्ञान व तंत्रज्ञान राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेन्‍द्र सिंह यांनी संसदेत यासंबंधीची माहिती दिली. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

चांद्रयान-३ हा भारताच्या महत्वाकांक्षी अशा चांद्रयान मोहिमेचा तिसरा टप्पा असणार आहे. चांद्रयान-३ या मोहिमेच्या तयारीमध्ये साधनांच्या मांडणीला सध्या अंतिम रूप देण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी उपप्रणालीची उपलब्धता, एकात्मीकरण , अवकाशयान पातळीची तपशीलवार चाचणी करणे आणि पृथ्वीवर प्रणालीच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे यासाठी विशेष चाचण्या घेण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलं शंभरीत पदार्पण

रंगकर्मीं का रागावले आहेत? जाणून घ्या कारणे…

भारताचे ‘भूत’ काढणार ‘साहेबांचा’ धूर

कोविड या जागतिक महामारीचा फटका चांद्रयान मोहिमेच्या कामालाही बसला होता. या महामारीमुळे चांद्रयान-३ च्या कामातही अडथळा निर्माण झाला होता. मात्र लॉकडाउन काळातही सर्व यंत्रणा वर्क फ्रॉम होम अर्थात घरून शक्य तेवढे काम करत होती. घरून करणे शक्य असलेली सर्व कामे लॉकडाऊन काळात करण्यात आली. तर अनलॉक कालावधी सुरू झाल्यानंतर चांद्रयान -3 चे काम पुन्हा वेगाने सुरू झाले आणि ते अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

 

Exit mobile version