चांद्रयान ३ची लँडिंग साइट ‘शिवशक्ती’ नावानेच ओळखली जाणार!

आयएयूने दिली मंजुरी

चांद्रयान ३ची लँडिंग साइट ‘शिवशक्ती’ नावानेच ओळखली जाणार!

गेल्यावर्षी २३ ऑगस्ट रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान -३ ची यशस्वी लॅंडींग करुन इतिहास रचला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत जगातला पहिला देश ठरला.भारतीय संशोधकांच्या या कामगिरीमुळे त्यांचे जगभरातून कौतुक झाले.पंतप्रधान मोदींनी इस्रो येथे जाऊन चंद्रयान -३ मोहिमेत सहभागी असलेल्या वैज्ञानिकांची भेट घेऊन संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३ ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ पॉईंट असे नाव देण्यात आले होते.आता या बाबत एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

वास्तविक इंटरनॅशनल एस्ट्रोनॉमिकल युनियनने ( IAU ) १९ मार्च रोजी शिव शक्ती नावाला अखेर मान्यता दिली आहे.आता अधिकृतपणे चंद्रावर ज्या जागी चंद्रयान-३ यान उतरले त्या जागेला जगभरात ‘शिव शक्ती’ पॉइंट नावाने ओळखले जाणार आहे.

हे ही वाचा :

बांगलादेशी मुस्लिमांना आधी भारतीय व्हावे लागेल तरच…

केजरीवालांच्या अटके विरोधात इंडी आघाडीचा ‘आक्रोश’!

अमरावती: २० हुन अधिक प्रवाशांसह एसटी बस दरीत कोसळली!

केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

ग्रहांच्या नामकरणाच्या संदर्भातील गॅझेटीयरच्या मते ग्रहांच्या सिस्टीमला नामकरणासाठी आयएयू वर्कींग ग्रुपने चंद्रयान-३ च्या विक्रम लॅंडरच्या लॅंडींग साईटच्या शिव शक्ती नावाला अखेर मान्यता दिली आहे.कोणत्याही अंतराळातील ठिकाणाची ओळख पटण्यासाठी त्याचे नामकरण करणे गरजेचे असते. त्यामुळे भविष्यात ती जागा सहज शोधता येईल आणि लोक त्याबद्दल चर्चा करू शकतील.

२३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅंडींग झाल्यानंतर तीन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरु येथे जाऊन या नावाची घोषणा केली होती.चंद्रयान -३ च्या लॅंडींगच्या जागेला ‘शिवशक्ती पॉइंट’ असे नाव दिले आहे तर २०१९ मध्ये चंद्रयान-२ क्रॅश होऊन जेथे लॅंडींग करताना अपयशी ठरले होते त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ हे नाव देण्यात आले.२३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

Exit mobile version