भारताचे चांद्रयान ३ शुक्रवारी अवकाशात झेपावले आणि या क्षणाची गेले काही दिवस वाट पाहात असलेल्या तमाम भारतवासियांनी अभिमानाचा क्षण अनुभवला. तिकडे फ्रान्समध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॅस्टिल परेडसाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी फ्रान्सच्या सैन्याकडून सलामी स्वीकारली. भारताच्या पंजाब रेजिमेंट, नौदल आणि हवाई दलाच्या सैनिकांनीही या परेडमध्ये सहभागी होत भारताचा डंका बुलंद केला. भारताची राफेल विमानेही फ्रान्सच्या अवकाशात झेपावली आणि भारताची ताकद दाखवून दिली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून त्यावेळी ते शुक्रवारी प्रतिष्ठेच्या बॅस्टिल परेडला उपस्थित होते. शॉ एलिझ येथून फ्रान्सच्या सेनादलाच्या तुकड्या तसेच भारतीय सैनिकांच्या तुकड्या परेड करत निघाल्या. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सैनिकांकडून सलामी स्वीकारली. त्याआधी, दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष एकमेकांना भेटले, त्यांनी गळाभेट घेतली. फ्रान्सनिर्मित राफेल ही लढाऊ विमानेही तिथे आकाशात झेपावली. २०१५ला भारताने फ्रान्समधून विकत घेतलेली ही विमाने या अवकाशात विहार करत होती.
हे ही वाचा:
चार हजार खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई; दंड वसूल
ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांनी केली भारतीय विद्यार्थ्याला मारहाण!
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस
कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू !
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी फ्रान्सची स्तुती केली. १ अब्ज ४० कोटी भारतीय जनता फ्रान्ससारख्या विश्वासू सहकाऱ्याबद्दल आदर व्यक्त करत आहे, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. या दोन देशातील हे संबंध अधिक सुदृढ व्हावेत अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली.
या परेडमध्ये भारतातील पंजाब रेजिमेंटचे सैनिक सहभागी झाले होते. कॅप्टन अमन जगताप यांच्या नेतृत्वाखाली या रेजिमेंटच्या तुकडीने परेडमध्ये भाग घेतला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनीही भारताचे कौतुक केले. गुरुवारी केलेल्या भाषणात ते म्हणाले की, जगाच्या इतिहासात भारताचे महत्त्वाचे स्थान आहे. आमच्या वाटचालीत भारताची खूप वेगळी भूमिका असेल.