25 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषचंदू पंडित यांचा मध्य प्रदेशला परीसस्पर्श;  मुंबईला नमवून जिंकले ऐतिहासिक रणजी विजेतेपद

चंदू पंडित यांचा मध्य प्रदेशला परीसस्पर्श;  मुंबईला नमवून जिंकले ऐतिहासिक रणजी विजेतेपद

Google News Follow

Related

चंद्रकांत पंडित यांचा परीसस्पर्श ज्या संघाला लाभला त्याचा विजय निश्चित झाला, असेच काहीसे समीकरण गेली काही वर्षे दिसून येते आहे. मुंबई, विदर्भ यांना रणजी करंडक राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत यशाची चव चाखायला लावणाऱ्या चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेश संघाने तब्बल ६९ वर्षांनी रणजी विजेतेपद जिंकले. तेदेखील मुंबईसारख्या ४१वेळा रणजी विजेतेपद पटकाविणाऱ्या संघाला नमवून.

मध्य प्रदेशने रणजी अंतिम फेरीत मुंबईवर ६ विकेट्सनी मात करत विजेतेपदाला गवसणी घातली. २३ वर्षांनी मध्य प्रदेशचा संघ रणजी अंतिम फेरीत पोहोचला होता. याआधी १९९८-९९मध्ये मध्य प्रदेशला ती संधी मिळाली होती पण विजेतेपदापासून ते वंचित राहिले होते. कर्नाटकविरुद्ध त्यांना ९६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे तेव्हा मध्य प्रदेशचे नेतृत्व चंद्रकांत पंडित करत होते तेच आज प्रशिक्षक म्हणून या संघाला लाभले आणि त्यांनी विजयश्री खेचून आणली.

विजयासाठी १०८ धावांचे लक्ष्य असताना हिमांशू मंत्रीने ३७ धावांची तर शुभम शर्माने ३० धावांची खेळी करत मध्य प्रदेशला हा विजय मिळवून दिला. रजत पाटीदारने ३० धावांची नाबाद खेळी करत विजयी धाव घेत मध्य प्रदेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सकाळी मुंबईने २ बाद ११३ धावसंख्येवर आपल्या डावाला प्रारंभ केला. सुवेद पारकरने किल्ला लढविला. पण सोबत असलेल्या अरमान जाफरला मध्य प्रदेशच्या गौरव यादवने त्रिफळाचीत केले. सर्फराज खानने धावफलक हलता राहील याची काळजी घेतली आणि सुवेद पारकरने तोपर्यंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण पारकर कार्तिकेयच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि नंतर लगेच यशस्वी जयस्वालला कार्तिकेयनेच टिपले. सर्फराजही नंतर ४५ धावा करून बाद झाला. या हंगामात त्याने ९८२ धावा केल्या. पार्थ सहानीने मुंबईची तळाची फलंदाजी गारद केली आणि मध्य प्रदेशला विजयासाठी १०८ धावांचे लक्ष्य मिळाले. पार्थ सहानीने २, तर कार्तिकेयने ४ बळी मिळविले. त्यामुळे मुंबईचा डाव २६९ धावात आटोपला.

हे ही वाचा:

“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”

बंडखोर आमदारांवरील कारवाईची वकिलांनी सांगितली कायदेशीर बाजू

‘दाऊदशी संबंध असणाऱ्यांचे समर्थन बाळासाहेबांची शिवसेना कशी करू शकते?’

आता आदित्य ठाकरेंची आमदारांना दमदाटी

 

मुंबईने पहिल्या डावात सर्फराजच्या १३४ धावांच्या जोरावर  ३७४ धावा केल्या पण मध्य प्रदेशने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. यश दुबे (१३३), शुभम शर्मा (११६), रजत पाटीदार (१२२), सारांश जैन (५७) यांच्या दमदार खेळाच्या जोरावर त्यांनी ५३६ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या डावात मात्र मुंबईची फलंदाजी साफ कोलमडली. सुवेद पारकर ५१, सर्फराज ४५ आणि पृथ्वी साव (४४) यांचा अपवाद वगळता मुंबईला फलंदाजांनी आधार दिला नाही. परिणामी, २६९ धावांतच मुंबईचा दुसरा डाव आटोपला.

या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शुभम शर्माची निवड झाली तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला सर्फराज खान.

स्कोअरबोर्ड

मुंबई पहिला डाव ३७४ (सर्फराज खान १३४, यशस्वी जयस्वाल ७८, गौरव यादव १०६-४, अनुभव अगरवाल ८१-३, सारांश जैन ४७-२) दुसरा डाव २६९ (सुवेद पारकर ५१, सर्फराज ४५ आणि पृथ्वी साव ४४, कुमार कार्तिकेय ९८-४, गौरव यादव ५३-२, पार्थ सहानी ४३-२) पराभूत वि. मध्य प्रदेश ५३६ आणि ४ बाद १०८ (हिमांशू मंत्री ३७, शुभम शर्मा ३०, रजत पाटीदार ३०).

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा