विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संधी मिळाव्यात यासाठी देशातील एका विद्यापीठाकडून जोरदार प्रयत्न केले गेले आहेत. त्यासाठी जगातील अनेक देशांशी सांमजस्य करार या विद्यापीठातर्फे करण्यात आले आहेत.
चंदिगढ विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, प्रकल्प, कॉन्फरन्सेस, संशोधनाच्या संधी इत्यादींचा लाभ घेता यावा यासाठी विद्यापीठाने जगातील विविध देशांशी एकूण ३०९ पेक्षा अधिक सामंजस्य करार केले आहेत. ॲकॅडेमिक अलायन्स प्रोग्रॅम अंतर्गत ६८ विविध देशांतील विद्यापीठांशी भागिदारी सुनिश्चित केली आहे. या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सार्क देश यांचा समावेश आहे. चंदिगढ विद्यापीठ हे देशातील अशा प्रकारे पाऊल उचलणारे पहिले विद्यापीठ ठरले आहे.
हे ही वाचा:
भारतात उपलब्ध होणार आणखी एक लस!!
जम्मू आणि काश्मिरमध्ये ‘या’ ठिकाणी फडकला १०० फूट उंच झेंडा
अबब!! त्यांनी घातला अडीच लाखांचा घोळ
पुणे मेट्रो विरोधकांना उच्च न्यायालयाची फटकार
अशा प्रकारच्या सांमजस्य करारांविषयी आणि त्यांच्या फायद्यांविषयी माहिती देताना, चंदिगढ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. एस बावा यांनी सांगितले की, विद्यापीठाने कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांतील उत्तमोत्तम विद्यापीठांशी करार केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन, प्रकल्प, इंटर्नशिप अशा विविध जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध होणार आहेत.
ज्यावेळेला कोविड महामारीमुळे संपूर्ण जग टाळेबंदीमध्ये होते, त्यावेळेला आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यास कटिबद्ध असलेल्या चंदिगढ विद्यापीठाने ६८ देशांशी सामंजस्य करार केला, असे डॉ. बावा यांनी सांगितले.
त्यांनी असे देखील सांगितले की या ३०९ विद्यापीठांपैकी अनेक विद्यापीठे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि न्यु झीलँड या देशातील विविध विद्यापीठांचा समावेश आहे. या विद्यापीठांपैकी ११५ विद्यापीठांना टाईम्स समुहाच्या क्रमवारीत स्थान पटकावले आहे. या विद्यापीठांमध्ये ब्रिटनमधील १३ विद्यापीठे, रशियामधील १७ विद्यापीठे, न्यू झीलँड ११ विद्यापीठे आणि फ्रान्समधील १० विद्यापीठ इत्यादी विद्यापीठांचा समावेश आहे.