बंदुक उद्योगातील नामांकित उत्पादक वेब्ली अँड स्कॉट हे भारतातील आपली गुंतवणुक वाढवण्यास उत्सुक आहेत. हर्दोई येथे भागीदारीत एक उत्पदन युनिट चालू केल्यानंतर स्वतंत्र युनिट चालू करायला ते उत्सुक आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे वेब्ली अँड स्कॉटचे युके प्रमुख जॉन ब्राईट सह इंजिनियर मार्क रम्बियाझ यांना भेटणार आहेत. या गुंतवणुकीच्या मार्फत नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया सोबतच योगी राज्याच्या विकासासाठी परराष्ट्र गुंतवणुक देखील आणत आहेत. या भेटी दरम्यान वेब्ली अँड स्कॉटचे अधिकारी त्यांची विविध उत्पादने योगी सरकारला दाखवणार आहेत.
जॉन ब्राईट यांनी योगी यांना लिहीलेल्या पत्रात स्वतः युकेहून उत्तर प्रदेशात येऊन गुंतवणुकीसाठीचा त्यांचा प्रस्ताव सादर करण्याबाबत लिहीले होते.
हे ही वाचा:
निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत
मनसुख हिरेन हत्त्येवेळी सचिन वाझे उपस्थित
वाधवान बंधूंवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाचा गुन्हा दाखल
वेब्ली अँड स्कॉट यांचा हर्दोई येथे एक कारखाना लवकरच उभा राहणार आहे. वेब्ली अँड स्कॉटचे भारतीय स्तरावरील प्रमुख वितरक असलेल्या सिआल मॅन्युफॅक्चरर्स सोबत हा कारखाना उभा करण्यात आला होता. नवा कारखाना मात्र ते स्वतंत्रपणे उभारू इच्छित आहेत.
सरकारी प्रवक्त्यांनुसार या कारखान्यात पिस्तुल, एअर गन, शॉटगन यांच्यासारख्या शस्त्रांचे उत्पादन होणार आहे.
वेब्ली अँड स्कॉट ही जगातील सर्वात जुनी शस्त्र उत्पादक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १७९० मध्ये करण्यात आली होती आणि ही भारतात स्वतंत्रपणे शस्त्र निर्मिती करणारी पहिली परदेशी कंपनी ठरण्याची शक्यता आहे.