भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रचला इतिहास, चीनचा १-० असा केला पराभव!

भारताचा तिसऱ्यांदा विजय

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रचला इतिहास, चीनचा १-० असा केला पराभव!

‘महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४’च्या अंतिम फेरीत चीनचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारतीय संघाने हे विजेतेपद पटकावण्याची ही तिसरी वेळ आहे. भारताकडून सामन्यातील एकमेव गोल दीपिकाने ३१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरमध्ये केला. बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अंतिम सामना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतही खेळाडूंचा प्रचंड उत्साह होता.

भारत आणि चीन यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पहिले दोन क्वार्टर गोलशून्य राहिले, म्हणजेच हाफ टाईमपर्यंत कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. मात्र तिसऱ्या क्वार्टरला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचे दीपिकाने गोलमध्ये रूपांतर केले. चीनने शेवटच्या क्षणापर्यंत गोल करण्याचा अथक प्रयत्न केला. असे असूनही चीनच्या संघाला गोल करता आला नाही.

दरम्यान, भारताने यापूर्वी दोनदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. २०१६ मध्ये टीम इंडियाने एका रोमांचक सामन्यात चीनचा २-१ असा पराभव केला होता. २०२३मध्ये, भारतीय संघाने विजेतेपदाच्या सामन्यात जपानचा ४-० असा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती. गेल्या पाच स्पर्धेत भारताने तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे, तर दुसरीकडे चीनने इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती.

हे ही वाचा : 

वांगी ते बिटकॉईन एक चित्तथरारक प्रवास…

बिटकॉइन घोटाळा: सुप्रिया सुळेंनी उल्लेख केलेल्या गौरव मेहताच्या घरी ईडीकडून धाड

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कराळे सराला मारहाण!

हर्षित माहिमकर, प्रिशा शाहला दुहेरी मुकुट

 

Exit mobile version