झारखंडचे मु्ख्यमंत्री चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. झारखंड विधानसभेत बहुमत चाचणी पार पडली. यामध्ये सोरेन सरकारने आपले बहुमत सिध्द केले. सोरेन यांच्या बाजूने ४७ मते मिळाली तर विरोधामध्ये २९ मते गेली. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना इडीने अटक केल्यानंतर चंपई सोरेन यांनी २ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ३१ जानेवारी रोजी हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. जमीन घोटाळा आणि मनी लॉड्रिंगप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी बहुमत सिद्ध केले आहे. या बहुमत चाचणीपूर्वी झारखंड मुक्ती मोर्चाचे ४० आमदार सोरेन यांच्या नेतृत्वाखाली थेट हैदराबादमध्ये गेले होते. चाचणीपूर्वी ते हैदराबादमधून रांचीमध्ये दाखल झाले. झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी पद आणि गोपनियेतेची शपथ दिली होती. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी यांनी चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवसांचा वेळ दिला होता. ८१ सदस्य असलेल्या झारखंड विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे ४८ आमदार आहेत. यामध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाकडे २९, काँग्रेसकडे १७, आरजेडी आणि सीपीआयकडे प्रत्येकी एक आमदार आहे. विरोधी पक्ष एनडीएकडे 32 आमदार आहेत. यामध्ये भाजप २६, एजेएसयु ३, एनसीपी १ आणि २ अपक्ष आमदारांचा समवेश आहे. याशिवाय एक जागा रिक्त आहे.
हेही वाचा..
आम्ही सरकारसाठी काम करतो कुटुंबासाठी नाही
राहुल गांधींची यात्रा देशाचे नुकसान करण्यासाठी!
पाकिस्तानात पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, १० पोलीस ठार तर ६ जखमी!
२०२६ फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यू जर्सीला!
इडीकडून कारवाई होणार हे निश्चित झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी रांची येथे आपल्या समर्थक आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांच्या पत्नी कल्पना सोरेनसुद्धा उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे सोरेन यांच्या अटकेनंतर कल्पना सोरेन या मुख्यमंत्री बनतील अशी अटकळ लावली जात होती. त्या दृष्टीने हालचाली सुरु होत्या. मात्र हेमंत सोरेन यांचे धाकटे बंधू आणि त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी सीता सोरेन यांच्या विरोधामुळे कल्पना सोरेन या मुख्यमंत्री बनू शकल्या नाहीत. त्यांचा कल्पना यांच्या नावाला प्रचंड विरोध होता असे बोलले जात आहे.
ज्या प्रकरणामध्ये हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे ते नेमके प्रकरण काय आहे? तर इडीने रांचीमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या ४.५५ एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीची चौकशी सुरु केली आहे. याच प्रकरणात महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यंच्या घरातून शासकीय कागदपत्रे तसेच मोबाईल जप्त करण्यात आले होते. त्यानंतर इडीने तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स पाठवले. त्यांच्याही घराची झडती घेण्यात आली होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली.