झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई सोरेन यांनी राज्याचे १२वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.चंपाई सोरेन यांच्या सोबतआणखी दोन मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. काँग्रेस नेते आलमगीर ॲलन आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सत्यानंद भोगता या दोघांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.आता चंपाई सोरेन यांना १० दिवसात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी अनेकांची नावे पुढे आली यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांचे देखील नाव होते.हेमंत सोरेन यांच्यानंतर चंपाई सोरेन मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळतील या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.अखेर या चर्चेला चंपाई सोरेन यांनी पूर्ण विराम देत झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यांच्यासोबत काँग्रेस नेते आलमगीर ॲलन आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सत्यानंद भोगता यांनाही मंत्रिपदाची शपथ घेतली.मात्र, आता त्यांची खरी परीक्षा असणार आहे, कारण १० दिवसात त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
मराठा आरक्षण सर्वेक्षणाला राज्य सरकारकडून मुदतवाढ नाही!
युक्रेनने बुडवली रशियाची युद्धनौका
‘पुष्पा’ फेम अभिनेता जगदीशची जामिनावर मुक्तता
मिळालेल्या माहितीनुसार, चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ४१ बहुमताचा आकडा पूर्ण करणे आवश्यक आहे तर झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्याने म्हटले आहे की, सध्या ४३ आमदार आमच्या सोबत आहेत.तर दुसरीकडे बहुमत गोळा करण्यासाठी चंपाई सोरेन यांच्याकडे १० दिवसांचा अवधी आहे, अशा स्थितीत आमदार तुटण्याची शक्यता आहे.अशी परिस्थिती टाळण्यासाठी आणि सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी आमदारांना तेलंगणात हलवण्यात आले आहे.