भाजपमध्ये प्रवेश करणार चंपाई सोरेन, दिल्लीमध्ये अमित शहांची घेतली भेट !

मंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटकरत दिली माहिती

भाजपमध्ये प्रवेश करणार चंपाई सोरेन, दिल्लीमध्ये अमित शहांची घेतली भेट !

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सोमवारी (२६ ऑगस्ट) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे चंपाई सोरेन भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाले. बैठकीदरम्यान आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंडमधील भाजपचे सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा हेही उपस्थित होते.

चंपाई सोरेन आणि मंत्री अमित शहा यांच्या भेटीची माहिती हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर दिली. हिमंता बिस्वा सरमा यांनी रात्री ११.३०  च्या सुमारास ट्विटरवर लिहिले, “झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या देशातील ज्येष्ठ  आदिवासी नेते चंपाई सोरेन यांनी काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.”

चंपाई सोरेन यांची भाजपमध्ये प्रवेशाची तारीख देखील त्यांनी दिली. सरमा यांनी सांगितले की, चंपाई सोरेन ३० ऑगस्ट रोजी रांचीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे चंपाई सोरेन झामुमोपासून वेगळे होऊन नवी संघटना स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा :

बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदींची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत ६ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान आमनेसामने

बलुच बंडखोरांनी केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या लष्करी जवानांसह ७३ जणांचा मृत्यू

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची देखरेख करणाऱ्या कंपनीच्या प्रोप्रायटर, स्ट्रक्चरल कन्सल्टंटवर गुन्हा

दरम्यान,  विधानसभा निवडणुकीपूर्वी चंपाई सोरेन यांचे हे पाऊल सत्ताधारी झामुमोसाठी मोठा धक्का मानला जात आहे. हेमंत सोरेन सरकारमधील मंत्री चंपाई सोरेन यांनी नुकतेच जेएमएमविरोधात बंड केले होते. तेव्हापासून त्यांच्या पुढच्या भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. भाजपमध्ये येण्याबाबत त्यांनी सर्व पर्यायांचा विचार करत असल्याचे सांगितले होते. नवा पक्ष स्थापन करण्याबाबतही ते बोलले होते. मात्र, मंत्री अमित शहांच्या भेटीनंतर ते नवा पक्ष काढणार नसून भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे.

Exit mobile version