दिल्लीत एका स्पायडरमॅनवर कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीतील द्वारका येथे स्पायडरमॅनचा पेहराव केलेला एक तरुण स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर दिल्ली वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी कारवाई करत तब्बल २६ हजारांचा दंड लावला आहे.
आजच्या युगात रिल्स बनवण्याच्या नादात लोक काय करतील याचा काही नेम नाही. यामध्ये अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. रिल्स बनवण्याच्या नादात आपण अनेक नियम तोडतो याचे त्यांना भानही नसते. अशीच एक घटना राजधानीच्या द्वारका येथून समोर आली आहे. येथे ‘स्पायडर मॅन’ची वेशभूषा केलेला एक व्यक्ती कारच्या बोनेटवर स्टंट करताना दिसला, याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. वास्तविक, द्वारकेच्या रस्त्यावर स्पायडरमॅनची वेशभूषा केलेला एक व्यक्ती गाडीच्या बोनेटवर बसला होता आणि कार रस्त्यांवर पूर्ण वेगाने धावत आहे. याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हयरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
दुर्गतपस्वी, ज्येष्ठ इतिहास संकलक अप्पा परब यांना ‘शिवसन्मान पुरस्कार’ !
वेळ पडल्यास अनिल देशमुखांचे ऑडीओ व्हिजुअल्स जाहीर करणार
सीएपीएफ, आसाम रायफल्समध्ये आता अग्निवीरांना संधी, १० टक्के जागा आरक्षित
ऑलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावर ऑस्ट्रेलियन महिलेवर पॅरिसमध्ये बलात्कार
यासंदर्भात ट्रॅफिक पोलिसांना ट्विटरवर तक्रार आली होती, त्यानंतर दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पथकाने स्कॉर्पिओ कारचा माग काढत स्टंट करणाऱ्या तरुणाला आणि वाहन चालकाला द्वारका येथील रामफळ चौकात पकडले. स्पायडरमॅनचा पोशाख परिधान केलेल्या व्यक्तीचे नाव आदित्य असे असून तो दिल्लीच्या नजफगडचा रहिवासी आहे. तर गौरव सिंग (१९) असे वाहन चालकाचे नाव असून तो महावीर एन्क्लेव्ह, दिल्ली येथील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. धोकादायक वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे आणि प्रदूषण प्रमाणपत्र नसणे यासाठी वाहतूक पोलिसांनी २६, ००० रुपयाचा दंड लावण्यात आला आहे. तसेच दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.