जनरल बिपिन रावत यांच्या नावाने ‘चेअर ऑफ एक्सलन्स’

जनरल बिपिन रावत यांच्या नावाने ‘चेअर ऑफ एक्सलन्स’

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांची ६५ वी जयंती आहे. यानिमित्ताने युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (यूएसआय) ने ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. जनरल बिपिन रावत यांच्या असामान्य कार्याची दखल घेत हे करण्यात येणार आहे.

लष्करप्रमुख जनरल मनोज एम नरवणे म्हणाले की, जनरल बिपिन रावत यांनी सैन्यात सामंजस्य राखण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. जो सशस्त्र दलांमध्ये एकता आणि अखंडता राखण्यासाठी महत्त्वाचा दुवा बनेल. ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ स्थापना म्हणजे जनरल बिपिन रावत यांच्या कुशल नेतृत्व आणि कार्यक्षम व्यावसायिक कार्याला आदरांजली आहे.

८ डिसेंबर २०२१ रोजी तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हेलिकॉप्टर क्रॅश झालेल्या देशाने पहिला CDS गमावला होता. यामध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह १४ जण होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला.

जनरल बिपिन रावत यांना त्यांच्या उत्कृष्ट कामांसाठी नेहमीच आदर मिळाला होता. शौर्य, राष्ट्राप्रती बांधिलकी, यशस्वी रणनीतीकार म्हणून त्यांना नेहमीच सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मानामध्ये UISM, AVSM, YSM, SM सारख्या महत्त्वाच्या सन्मानांचाही समावेश आहे. त्यांना यावर्षी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांनी पारदर्शक भूमिका घेतली असती तर…

आसाम मधील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार काश्मीर फाईल्स पाहण्यासाठी अर्ध्या दिवसांची सुट्टी

होळीच्या निमित्ताने ठाकरे सरकारची नवी नियमावली

नवाब मलिकांना दणका; ईडी फराझ मलिकला तिसरं समन्स पाठवणार

जनरल बिपिन रावत हे भारतीय लष्करी अधिकारी होते जे भारतीय लष्कराचे चार-स्टार जनरल होते. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी भारतीय सशस्त्र दलांचे पहिले प्रमुख संरक्षण कर्मचारी म्हणून काम केले आहे.

Exit mobile version