32 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषमालपेकर यांची सोनसाखळी हिसकावणारा अटकेत

मालपेकर यांची सोनसाखळी हिसकावणारा अटकेत

Google News Follow

Related

ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरणाऱ्याला शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी अटक केली. हा आरोपी आणखी एक सोनसाखळी चोरत असताना त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कल्पना शाह नावाच्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करून तो पळत होता. दोन दिवसात शिवाजी पार्क परिसरात याच आरोपीने दुसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव हनिफ शेख असे असून तो धारावीतला रहिवासी आहे..

सविता मालपेकर यांच्या गळ्यातील ३० ग्राम वजनाची सोनसाखळी खेचून या चोराने पळ काढला होता. या घटनेत अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अंगावरील कुर्ता फाटला.सोमवारी रात्री दादरच्या शिवाजी पार्क येथील राजा बडे चौकात ही घटना घडली.

हे ही वाचा:

राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोमात

गढूळ पाण्यामुळे लोकांची वाढली चिंता

जिन्ना हाऊस म्हणजे फाळणीचे दुःखद स्मृतिस्थळ

राजकीय स्वार्थासाठी ठाकरे सरकार करतंय महाराष्ट्राची बदनामी

अभिनेत्री सविता मालपेकर या दादर शिवाजी पार्क परिसरात राहण्यास आहेत. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मालपेकर जेवण करून फेरफटका मारण्यासाठी शिवाजी पार्क मैदान, राजा बडे चौक येथे आलेल्या होत्या. फेरफटका मारून झाल्यानंतर मैदानाच्या गेट नंबर ५ येथील बाकड्यावर बसलेल्या असतांना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आली. त्याने मालपेकर यांना किती वाजले ? असे विचारले, मात्र मालपेकर यांनी त्या व्यक्तीला काहीच उत्तर न दिल्यामुळे ती व्यक्ती तेथून निघून गेली.

काही वेळाने पुन्हा तीच व्यक्ती मालपेकर बसलेल्या बाकाजवळ आली, आणि काही कळण्याच्या आत त्याने सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून मोटारसायकलवर बसून पळ काढला. सोनसाखळी मालपेकर यांच्या कुर्त्यात अडकल्यामुळे त्याचा कुर्ता देखील फाटला, मालपेकर यांनी चोर चोर ओरडताच फेरफटका मारणाऱ्या इतर नागरिकांनी मालपेकर यांच्या दिशेने धाव घेतली. पण तोपर्यंत चोर पळून गेला होता. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसानी धाव घेऊन सविता मालपेकर यांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा