छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील दक्षिण अबुझमद येथे गुरुवारी (१२ डिसेंबर) सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांना सात नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. दंतेवाडा एसपी गौरव राय यांनी याला दुजोरा दिला आहे.
या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाल्यानंतर मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी जवानांना प्रोत्साहन दिले. मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले, “दंतेवाडा-बस्तरमध्ये नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू होते, ज्यामध्ये सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात आमच्या सुरक्षा दलांना यश आले. त्यांच्या धैर्याला मी सलाम करतो.”
हे ही वाचा :
एलन मस्कची संपत्ती ४०० अब्ज डॉलर्स पार!
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
मंत्री मंडळात कोणताही तिढा नाही, फॉर्मुला ठरलाय, लवकरच कळेल
पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असलेल्या दोघांना भिवंडी, अमरावतीमधून घेतले ताब्यात
नक्षलविरोधी शोध मोहिमेत नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्यातील डीआरजीसह एसटीएफ-सीआरपीएफची संयुक्त टीम आज पहाटे ३ च्या सुमारास दक्षिण अबुझमद भागात गेली असता, त्याचवेळी चकमक सुरु झाली. नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला पोलीस जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. अजूनही दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईत आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झाले आहेत.
छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले, “माहितीच्या आधारे कारवाई केली जात आहे आणि ड्रोनद्वारे नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे, त्यामुळे त्यांच्याकडे कोणताही मार्ग नाहीये. येत्या काही वर्षांत नक्षलवादाची दहशत बस्तरमधून संपली पाहिजे, असा सरकारचा संकल्प आहे. नारायणपूरमध्ये ७ नक्षलवादी मारले गेले आहेत आणि चकमक सुरू आहे.