गर्भाशयाच्या कर्करोगावर आता आली लस

पहिली स्वदेशी लस काही महिन्यांत बाजारात येणार

गर्भाशयाचा कर्कराेग झालेल्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंध करण्यासाठी देशातच विकसित करण्यात आलेली ‘क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ ही पहिली स्वदेशी लस काही महिन्यांत बाजारात येणार आहे. ही लस २००-४०० रुपयांच्या परवडणाऱ्या किमतीत लोकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ही स्वदेशी बनावटीची लस बनून तयार असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. सर्वसामान्यांना ही लस उपलब्ध करून देणं हा पुढचा टप्पा असेल असेही त्यांनी सांगितलं.

सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला म्हणाले की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचाव करणारी ही लस काही महिन्यांत उपलब्ध होईल आणि त्याची किंमत २०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान असू शकते. परंतु त्याची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही असं त्यांनी सांगितलं. पूनावाला यांनी असेही सांगितले की, ही लस प्रथम भारतातील लोकांना आणि नंतर जगभरातील लाेकांसाठी वितरित करण्यात येईल . येत्या दाेन वर्षात या लसीचे २००दशलक्ष डोस तयार करण्याची तयारी करत आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या या लसीला भारतीय औषध नियंत्रक महासंचालकांकडून १२ जुलै रोजी मार्केट ऑथरायझेशन मिळालं होतं.

हे ही वाचा:

देश बदलणारं ‘फिझंट आयलंड’

सर्वोत्कृष्ट मंडळाला मिळणार पाच लाख

बाप्पा आले घरी! सोन्याला झळाळी

बीसीसीआय म्हणजे ‘क्रिकेट की दुकान’

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे काय?

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो ग्रीवाच्या पेशींमध्ये होतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो लैंगिक संक्रमित संसर्ग आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यासाठी हा विषाणू सर्वाधिक जबाबदार असतो. ९ ते १४ वयोगटातील मुलींना ही लस दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

लसीकरण उपयुक्त

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश केल्यास महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची समस्या कमी करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरू शकते.

देशात गर्भाशयाचा कर्कराेग दुसऱ्या स्थानावर

महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्कराेग हाेण्याचे प्रमाण जास्त आहे. एका अहवालानुसार, १५ ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे.जागतिक आराेग्य संघटनेच्या अहवालानुसार २०२० मध्ये जगभरात ६ लाखांपेक्षा जास्त केसेसची नाेंद झाली तर ३. ४२ लाख मृत्यू झाले. स्तनांच्या कर्कराेगानंतर भारतात गर्भाशयाचा कर्कराेग दुसऱ्या स्थानावर आहे. या नवीन गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण ९० % पर्यंत कमी होऊ शकते असं म्हटल्या जात आहे.

Exit mobile version