बातमीत “दहशतवादी” ऐवजी “मिलिटंट” शब्द लिहिणाऱ्या बीबीसीला केंद्राचे पत्र

परराष्ट्र मंत्रालय बीबीसीच्या पुढील वृत्तांकनावर लक्ष ठेवणार

बातमीत “दहशतवादी” ऐवजी “मिलिटंट” शब्द लिहिणाऱ्या बीबीसीला केंद्राचे पत्र

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच बीबीसीच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या कव्हरेजबद्दल भारत सरकारने आक्षेप नोंदवला आहे. केंद्र सरकारने भारतातील बीबीसी प्रमुखांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या कव्हरेजबद्दल आक्षेप नोंदवत पत्र लिहिले आहे. “काश्मीर हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीयांसाठी व्हिसा निलंबित केला” असे शीर्षक असलेल्या बातमी बीबीसीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख हा “मिलिटंटकडून करण्यात आलेला हल्ला” (militant attack) असा केला. यामुळे मोदी सरकारने बीबीसीचे भारत प्रमुख जॅकी मार्टिन यांना पत्र लिहिले आहे.

दहशतवाद्यांसाठी “दहशतवादी” हा शब्द वापरण्यासंबंधी हे पत्र लिहिण्यात आले असून बीबीसीला लिहिलेल्या औपचारिक पत्रात सरकारने पुढे म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्रालय बीबीसीच्या पुढील वृत्तांकनावर लक्ष ठेवेल. दरम्यान, केंद्र सरकारने पाकिस्तानमधील १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. यात डॉन, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, जिओ न्यूज, रझी नामा, जीएनएन, इर्शाद भट्टी इत्यादींचा समावेश आहे.

बीबीसी प्रमाणेच काही दिवसांपूर्वी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने त्यांच्या पहलगाम संबंधीच्या बातमीत ‘दहशतवादी’ शब्दाऐवजी ‘मिलिटंट’ हा शब्द वापरला होता. अमेरिकन हाऊस फॉरेन अफेयर्स कमिटीने यानंतर ‘द न्यूयॉर्क टाईम्स’वर टीका केली होती आणि “दहशतवादी” शब्दाऐवजी “बंदूकधारी”सारखे शब्द वापरून घटनेचे गांभीर्य कमी लेखल्याचा आरोप केला होता. एक्सवरील एका पोस्टमध्ये, समितीने वृत्तपत्राच्या मूळ मथळ्याचा फोटो शेअर केला होता. तसेच मिलिटंट शब्दावर लाल रंगाने फुली मारत दहशतवादी शब्द वापरण्याचा सल्ला दिला.

हे ही वाचा : 

भारत- नेपाळ सीमाभागातील २५० हून अधिक बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई!

पहलगाम हल्ल्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या नेहा सिंग राठोड विरोधात गुन्हा

सिंधू नदीतून भारतीयांचे रक्त वाहिले तर पाकिस्तानींचे रक्तही वाहील

सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन

पहलगाम हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांना ठार करण्यात आले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सर्वोच्च पातळीवर आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर इस्लामाबादवर प्रत्युत्तर देताना नवी दिल्लीने १९६० चा सिंधू पाणी करार स्थगित केला, द्विपक्षीय संबंध कमी केले आणि अटारी चेकपोस्ट बंद केली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. सध्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी एनआयए करत आहे.

भारतमाता की जय नको! पाकिस्तान झिंदाबाद हवे ?  | Mahesh Vichare | Pahalgam Attack |

Exit mobile version