नार्कोटिक्स ब्युरोची पाळेमुळे विस्तारणार

नार्कोटिक्स ब्युरोची पाळेमुळे विस्तारणार

नव्या पदांच्या निर्मितीला केंद्राची मान्यता

देशभरात अंमली पदार्थ विरोधी सुरू असलेल्या ऑपरेशनला बळकटी देण्यासाठी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये (NCB) पदांच्या निर्मितीसाठी मान्यता दिली आहे. १ हजार ८०० पदांच्या निर्मितीसाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच अजमेर, डेहराडून, अमृतसर, भुवनेश्वर, गोवा, हैदराबाद, मदुराई, मंडी, इम्फाळ, मंदसौर, रायपूर, रांची आणि कोची या १२ ठिकाणी एनसीबीच्या उप-क्षेत्रीय (Sub- Zonal) कार्यालयांच्या अपग्रेडेशन होणार असल्याची माहिती आहे.

सध्या एनसीबीचे देशभरात १ हजार १०० कर्मचारी आहेत. एनसीबीने उपसंचालक आणि सहाय्यक संचालकांसह विविध स्तरावरील ३ हजार रिक्त पदांसाठी मंजुरी मागितली होती. त्यानंतर केंद्रीय गृह आणि वित्त मंत्रालयाने केवळ १ हजार ८०० पदांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजा इतके रुपये

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नांदेडमधून १० तलवारी जप्त; एकाला अटक

कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग

गृह मंत्रालयाने २०१६ मध्ये एनसीओआरडीची स्थापना केली होती. विविध भागधारकांमध्ये पुढील समन्वय आणि सहकार्यासाठी २०१९ मध्ये त्याची जिल्हा स्तरापर्यंत चार स्तरांमध्ये पुनर्रचना करण्यात आली. NCB झोन सध्या अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, इंदूर, जम्मू, दिल्ली, गुवाहाटी, जोधपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पाटणा येथे सक्रिय आहेत. आकडेवारीनुसार २०१८ ते २०२१ दरम्यान, भारतीय अधिकार्‍यांनी १ हजार ८८१ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले होते.

Exit mobile version